Sun, Aug 09, 2020 05:45होमपेज › Marathwada › गडचिरोली नक्षलवादी हल्ल्यात पाटोद्याचे सुपुत्र तौसीफ शेख शहीद 

गडचिरोली नक्षलवादी हल्ल्यात पाटोद्याचे सुपुत्र तौसीफ शेख शहीद 

Published On: May 01 2019 9:11PM | Last Updated: May 01 2019 9:10PM
पाटोदा प्रतिनिधी 

१ मे रोजी महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यातील जांबुरखेडा गावातील नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरंग स्फोटात सोळा जवान शहीद झाले. या जवानांमध्ये पाटोदा शहरातील क्रांतीनगर भागातील रहिवासी असलेले शेख तौसीफ आरिफ हे जवान शहीद झाले असून, पाटोदा शहरात ही बातमी कळताच संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.

तौसीफ शेख हे २०१० साली गडचिरोली पोलिस मध्ये शिपाई पदावर भरती झाले होते दि.२६ एप्रिल २०११ साली ते त्यांची गडचिरोली जिल्ह्यात नियुक्ती झाली होती. त्यांनी आपल्या कार्यकाळात मोठा पराक्रम गाजवला होता. तब्बल सहा वेळा नक्षलवाद्यांशी झुंज देत तीन वर्षातच त्यांनी पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यांना पोलिस महासंचालकांनी पदक देऊन गौरविले होते. त्यानंतर पाटोदा शहरात त्यांचा मोठा सत्कार देखील करण्यात आला होता. मात्र आज नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात ते शहीद झाले. तौसीफ शेख यांच्या घरी आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.