Wed, Aug 05, 2020 19:17होमपेज › Marathwada › माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव निलंगेकर कोरोनामुक्त

माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव निलंगेकर कोरोनामुक्त

Last Updated: Aug 02 2020 6:44PM

माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव निलंगेकरनिलंगा : पुढारी वृत्तसेवा 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोनावर मात केली असून त्यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

वाचा : बुलढाण्यात ८० कोरोना पॉझिटिव्ह 

डॉ.निलंगेकर यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी कार्यकर्त्यांनी देवाला प्रार्थना केली होती. देव पाण्यात ठेवले होते.डॉ. निलंगेकर यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याच्या या गोड बातमीने जिल्हा व जिल्ह्या बाहेरुन मोठा आनंद व्यक्त होत आहे. देवाचा आशीर्वाद व जनतेच्या शुभेच्छांच्या बळावर दादासाहेबांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांची प्रकृती आता चांगली असून त्यामध्ये सुधारणा होत असल्याचे त्यांचे सुपूत्र तथा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

वाचा : बीड : बंद वेबसाईटमुळे हजारो शेतकरी विमा भरण्यापासून वंचित