होमपेज › Marathwada › 144 तलावांत 8 हजार  हेक्टरवर मासेमारी

144 तलावांत 8 हजार  हेक्टरवर मासेमारी

Published On: Apr 24 2018 1:06AM | Last Updated: Apr 23 2018 11:28PMपरभणी : प्रदीप कांबळे

जिल्ह्यातील तीन नद्यांच्या 265 कि.मी.जलक्षेत्रावर मासेमारी व्यवसाय करण्यात येतो. पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींकडून बांधलेल्या एकूण 144 तलावांतील  9 हजार 96.58 जलक्षेत्रांपैकी 8 हजार 912 हेक्टरवर मासेमारी योग्य जलक्षेत्रात मत्स्य  व्यवसाय केला जातो. यासाठी दरवर्षी लिलावातून मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना ठेका देऊन मत्स्य उत्पादन केल्या जाते. यावर्षी 39 मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांकडून 9 लाख 16 हजार 808 मे.टन उत्पादन अपेक्षित आहे.

परभणी जिल्ह्यातून तीन प्रमुख नद्यांचा प्रवाह होतो. यात सेलू तालुक्यातील दुधना नदी 32.45 कि.मी, पाथरी 26.50 कि.मी.मानवत 5.42 कि.मी., परभणी 19.88 कि.मी, गोदावरी परभणी 30 कि.मी., सोनपेठ 12.5 कि.मी. गंगाखेड 34.31 कि.मी., पालम 16.86 कि.मी., पूर्णा 5.90 कि.मी., पूर्णा नदी पूर्णा 5.90, जिंतूर 78.63 कि.मी वाहते. या नद्यांवर शासनाच्या पाटबंधारे विभागाने एकूण 8 हजार 255.73 जलक्षेत्रावर 28 तलाव बांधले आहेत. त्यात 0 ते 200 हेक्टरवर 25, 200.1 ते 1000 हेक्टरवरील 2, 1000 हेक्टरवरील 1 बंधार्‍याचा समावेश आहे. जिल्हा परिषदेकडून एकूण 65 तलाव बांधले आहेत. त्याबरोबर ग्रामपंचायतीकडूनही 51 तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. या सर्व प्रकारच्या तलावातील 8 हजार 912 हेक्टर जल क्षेत्रात मत्स्य व्यवसाय करण्यात येतो.शासनाकडून मत्स्य व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पारंपरिक मत्स्य व्यवसाय मोडीत काढून मत्स्य व्यावसायिकांनी संघटित आणि तंत्रज्ञानयुक्त आधुनिक व्यवसाय करावा यासाठी शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाकडून त्यांना प्रोत्साहन दिल्या जाते. यावर्षी जिल्ह्यातील 39 मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना वरील तलावात मासेमारी करण्याठी ठेका देण्यात आला आहे. एका वर्षात 9 लाख 16 हजार 808 मे.टन मत्स्य उत्पादित होणे अपेक्षित आहे. यासाठी शासनाकडून त्यांना मत्स्य बीज उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

त्याबरोबर मत्स्य व्यावसायिकांना 50 टक्के अनुदान देण्यात आलेे. मासेमार्‍यांना शासनाकडून अपघात घटक योजनाही सुरू करण्यात आली असून दोन लाख रुपये  इतकी आर्थिक मदत अपघात पीडितांना करण्यात येते. नील क्रांती योजनेच्या माध्यमातून शेततळ्यांमध्ये मासेमारी करण्यास प्रोत्साहन देण्यात येतेे. पारंपरिकता सोडून मासेमार्‍यांनी व्यवसायाला आधुनिकतेची जोड द्यावी यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करून मार्गदर्शन करण्यात येते.

Tags : Marathwada, Fishing, 8 thousand, hectares, 144 Lake