होमपेज › Marathwada › ग्लोबल टू लोकल नको, लोकल टू ग्लोबल हवे : पंकजा मुंडे

ग्लोबल टू लोकल नको, लोकल टू ग्लोबल हवे : पंकजा मुंडे

Published On: Nov 04 2018 11:08PM | Last Updated: Nov 04 2018 11:08PMबीड : प्रतिनिधी 

वाडी- वस्ती आणि तांडयावरील महिलांना अमेरिकेला नेऊन जागतिक महासत्ता असलेल्या देशात महाराष्ट्राच्या महिला सक्षमीकरणाचा झेंडा फडकवणाऱ्या पंकजा मुंडे यांनी अमेरिकेतील एम आयटी, फेसबुक, वॉट्सअप्प, हॉवर्ड युनिव्हर्सिटी येथे भेट दिली. महाराष्ट्रातील महिला आता फक्त बचत करण्या पुरत्या मर्यादित नाहीत तर लघु उधोजक बनल्या आहेत, त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळने गरजेचे आहे. हे सांगताना ग्रामीण भागातील लोकांनी आजपर्यंत ग्लोबल टू लोकलचे स्वागत केले,  आता तुम्ही आमच्या ग्रामीण उत्पादनाला मार्केट मिळवून देण्यासाठी लोकल तू ग्लोबल असे सहकार्य करा असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. 

पंकजा मुंडे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे लवकरच अमेरिकेतील मोठ्या संस्था महिला बचत गटांच्या उत्पादनाला जागतिक बाजरपेठ मिळवून देण्यासाठी, महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तूंना "लोकल टू ग्लोबल" करण्यासाठी भारतात येणार आहेत. एकंदरीतच पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली झालेला अमेरिका दौरा तळागाळातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे.