होमपेज › Marathwada › 'काँग्रेस- राष्ट्रवादीतील नेतेही महाजनादेश यात्रेचे स्वागत करतील'

'काँग्रेस- राष्ट्रवादीतील नेतेही महाजनादेश यात्रेचे स्वागत करतील'

Published On: Aug 27 2019 1:40PM | Last Updated: Aug 27 2019 1:40PM

महाजनादेश यात्रेनिमित्त बीडमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधलाबीड : प्रतिनिधी

महाजनादेश यात्रेनिमित्त बीडमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधीनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, काँग्रेस राष्ट्रवादीतील नेतेही महाजनादेश यात्रेचे स्वागत करतील असा दावा केला. तर, काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मागील सरकारच्या तुलनेत मराठवाड्याला भाजप सरकारने सर्वाधिक न्याय दिला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणि राष्ट्रीय महामार्गाची सर्वाधिक कामे मराठवाड्यात झाली आहेत. आता मराठवाड्यातील दुष्काळाला भूतकाळ करायचे आहे. मराठवाडा वाटर ग्रीडची 40 वर्षांपूर्वीच्या मागणीला भाजप सरकारनेच मूर्त रूप दिले, असे ते म्हणाले. 

विनायक मेटे यांनी लोकसभेला विरोधात काम केले अन आज ते तुमचा सत्कार करतात या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ज्यांनी विरोध केला त्यांचे काय झाले हे तुम्ही पाहिलेच आहे. अनेकजण सत्कार करतात यात्रेच्या पुढच्या प्रवासात काँग्रेस- राष्ट्रवादीतील नेतेही सत्कार करायला येतील असे म्हणत अनेक आमदारांचे भाजपात प्रवेश होणार असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खा. प्रीतम मुंडे, आ. सुजितसिंह ठाकूर यांच्यासह बीड जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.