Wed, May 19, 2021 04:45
बीड : वीज पडून गर्भवती महिलेचा मृत्‍यू  

Last Updated: May 02 2021 6:02PM

File photo
बीड : पुढारी वृत्‍तसेवा 

आज (रविवार) दुपारी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात पावसाला सुरूवात झाली. या पावसामध्ये वीज पडून नेकनूर (लोखंडे वस्ती) मध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. ती आठ महिन्याची गर्भवती होती.     

अधिक वाचा : ‘नंदीग्राम’मधून ममता बॅनर्जी अवघ्या १२०० मतांनी विजयी!

या विषयी अधिक माहिती अशी की, आज (रविवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नेकनूर मध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा हा पाऊस जवळपास अर्धा तास सुरू होता. या पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली, तर या पावसामुळे नेकनूर मध्ये लोखंडे वस्ती येथील राधाबाई दिपक लोखंडे (वय २० वर्ष) या महिलेचा अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. राधाबाई आपल्या नातेवाईकांसह वादळवारे सुटल्यामुळे घराकडे परतत होती. यावेळी त्‍यांच्या अंगावर वीज कोसळून त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. सदरील महिला ही आठ महिन्यांची गर्भवती होती. या घटनेमुळे नेकनूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यूची नेकनूर पोलिस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.