Sun, Aug 09, 2020 05:26होमपेज › Marathwada › अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मोर्चाने शहर दणाणले

अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या मोर्चाने शहर दणाणले

Published On: Aug 02 2018 1:59AM | Last Updated: Aug 02 2018 1:37AMबीड : प्रतिनिधी

 अंगणवाडी कर्मचार्‍यांना जून 2018 च्या मानधनाची रक्कम देऊन यापुढे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला मानधन मिळेल अशी व्यवस्था करावी यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने बुधवार जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  अंगणवाडी कर्मचार्‍यांनी दिलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.

अंगणवाडी कर्मचार्‍यांची सर्व रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत, छापील रजीस्टर व अहवाल फॉर्म द्यावा, सर्व मिनी अंगणवाडी केंद्राचे रूपांतर नियमित अंगणवाडी केंद्रात करावे, सन 2017 व 2018 च्या परिवर्तन निधीची थकित रक्कम ताबडतोब द्यावी, दरवर्षी गणवेशासाठी 1 हजार रुपये द्यावेत, ग्राम बालविकास केंद्राच्या अतिरिक्त कामासाठी ताशी 60 रुपये द्यावेत, अतिरिक्त पदभारासाठी एकूण मानधनाच्या 50 टक्के अधिक मानधन द्यावे, अंगणवाडी कर्मचार्‍यांना महिन्याच्या 1 तारखेला मानधन देण्याची व्यवस्था करावी, कायम कर्मचार्‍याचा दर्जा देऊन त्यांना शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन व भत्ते लागू करण्यात यावेत, अंगणवाडी कर्मचार्‍यांचे थकीत टीएडीए व इंधन बिल त्वरित देण्यात यावे, सेवासमाप्ती लाभामध्ये तिपटीने वाढ करावी, शासन आदेशाप्रमाणे अंगणवाडी केंद्राचे भाडे वाढवून देण्यात यावे, लाईन लिस्टींग व बालहक्क आधारकार्ड नोंदणीच्या कामाची सक्ती करू नये, 50 टक्के मुख्यसेवकांची पदे पात्र अंगणवाडी सेविकांमधून भरावित आदी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने कार्याध्यक्षा मंगला सराफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात संध्या मिश्रा, अनुसया वायबसे, सिंधू घोळवे, लोखंडे, सुमन आहेर, ज्योत्स्ना नानजकर, करुणा पोरवाल, पुष्पा अलाट, हिरा वाघमारे, महानंदा मोगरकर, सुनंदा शिंदे, वृंदावणी कदम आदींसह कर्मचारी सहभागी झाल्या.