Sat, Aug 15, 2020 13:07होमपेज › Marathwada › परळी -गंगाखेड महामार्गावर अपघात; दुचाकीस्वार ठार

परळी -गंगाखेड महामार्गावर अपघात; दुचाकीस्वार ठार

Published On: Jun 13 2019 2:20PM | Last Updated: Jun 13 2019 2:20PM
परळी वैजनाथ  : प्रतिनिधी

परळी-गंगाखेड राज्यरस्ता  मार्गावर खदानीलगत एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वारास धडक दिली. यामध्ये मोटार सायकलस्वार जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वार चालवत असलेल्या पल्सर गाडीचा अक्षरश चुराडा झाला आहे.

शिवाजी नगर परळी येथील रहिवासी असलेला अशोक व्यकंटी कदम (वय 22 वर्ष) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून परळीकडे येत होता. समोरून वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्‍याच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. युवकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी परळी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता. या घटनेने परळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन थर्मलकडे जाणाऱ्या फाट्यावर गतिरोधक बसविण्याची गरज.....

दरम्यान, नवीन थर्मलच्या परिसरातून होणारी राखेची वाहतूक अनेक अपघातांना कारणीभूत ठरताना दिसून येते. या वाहतुकीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसते. मर्यादेपेक्षा जास्त राख भरल्याने बऱ्याच वेळेला ही राख रस्त्यालगत टाकण्यात येते, याचा त्रास दुचाकी स्वारांना जास्त होतो. शिवाय नवीन थर्मल फाट्याकडून गंगाखेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर उतार असल्याने या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवून गाड्यांची गती कमी करण्याची गरज आहे.