Tue, Sep 29, 2020 18:34होमपेज › Marathwada › बीड : परळीत महिलेचे अपहरण करुन बलात्कार

बीड : परळीत महिलेचे अपहरण करुन बलात्कार

Last Updated: Jul 10 2020 1:39AM
बीड : प्रतिनिधी

परळी शहर पोलिस ठाण्यामध्ये मिसिंगची नोंद असलेल्या शहरातील एका ४३ वर्षीय विवाहित महिलेस १४ दिवस एका घरात कोंडून एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी त्या नराधमा विरूध्द मंगळवारी ( दि.७ जुलै) गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा : नांदेडमधील कोरोना बळींची संख्या २३ वर

सुत्रांकडून मिळालेली माहिती नुसार, एका ४३ वर्षीय विवाहित महिलेने आपले अपहरण करून एका घरात तब्बल १४ दिवस डांबून ठेवून एकाने बलाक्तार केल्याची फिर्याद पोलिसात दिली. आरोपी शादाब खान (रा.बंगला मोहल्ला, परळी) याच्या विरोधात मंगळवारी रात्री पोलिस ठाण्यात पीडित महिलेने फिर्याद दिली. आरोपी शादाब खान याने मला १४ दिवस घरात डांबून बलात्कार केला व सहा ग्रॅम सोन्याची अंगठी काढून घेतली. मी कशीबशी त्याच्या तावडीतुन सुटका करून घेतली, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. पीडित महिला मिसिंग असल्याची नोंद परळी पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. 

अधिक वाचा : मुलाला लॅपटॉप देऊ न शकल्याने शेतकऱ्याने केली आत्महत्या

महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी शादाब खान विरूध्द गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार झाला आहे. पुढील तपास स.पो.नि.आरती जाधव या करीत आहेत.

अधिक वाचा : मराठी कलाकारांचा पुढाकाराने परभणीकर आता कोकणाची हिरवळ भोगदेवीत अनुभवणार

 "