Sun, Sep 20, 2020 11:08होमपेज › Marathwada › परभणीत बाधितांची संख्या पोहोचली ८२ वर

परभणीत बाधितांची संख्या पोहोचली ८२ वर

Last Updated: Jun 01 2020 4:49PM

संग्रहित छायाचित्रपरभणी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वेगाने पसरत असून रविवार (दि.३१) सायंकाळी ७ वाजेपर्यंत नविन ८ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या ८२ झाली. जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ३३१ कोरोना संशयीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ हजार ४८७ जणांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २ हजार ८० अहवाल निगेटीव्ह आले असून ८२ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर २२८ नमुने प्रलंबीत असून ३० नमुन्यांची तपासणी करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आलो आहे. 

नागपूरातील कोरोना कंट्रोलचा मुंडे पॅटर्न; अर्ली ट्रेसिंग, मास क्वारंटाईन, टीम मॅनेजमेंट

रविवार (दि.३१) ११० जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तर आधी काही नमुनेही तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी १७९ निगेटिव्ह तर ८ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ७४ वरुन ८२ वर पहोचली आहे. यातील एका रूग्णास कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर २ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून ७९ रूग्ण उपचार घेत आहेत.

 "