Mon, Apr 12, 2021 02:51
बुलडाणा : कोरोनाचा एक बळी, ३०८ पॉझिटिव्ह

Last Updated: Feb 26 2021 8:27AM

बुलडाणा : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख चढताच राहत असून आज गुरूवारी (दि.२५) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात ३०८ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 

अधिक वाचा : बुलडाणा : मळणीयंत्रात अडकून तरूणाचा मृत्यू

दरम्यान जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता १७,५८८ झाला. आज १३४ रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत १५, ०७९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २३१७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात १९२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ७१३१ रूग्णांच्या स्वॅब तपासणीचे अहवाल प्राप्त व्हावयाचे आहेत. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली.