Tue, Sep 29, 2020 10:33होमपेज › Konkan › आंबोली परिसरात अतिवृष्टी, पूरसदृश्य स्थिती

आंबोली परिसरात अतिवृष्टी, पूरसदृश्य स्थिती

Last Updated: Aug 05 2020 5:33PM

आंबोली : आंबोलीत अतिवृष्टी होत असल्याने येथील प्रसिद्ध धबधबा पूर्णक्षमतेने प्रवाहित झाला आहे.आंबोली : प्रतिनिधी

गेले चार दिवस आंबोली परिसरात अतिवृष्टी होत असून जोरदार वाऱ्यासह कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरसदृश्य स्थिती निर्माण आहे. गेल्या २४ तासात आंबोली येथे सुमारे १४ इंच (३५५ मिमी) पाऊस झाला असून बुधवारी (दि. ५) आंबोली घाटमार्गात पुर्वीचा वस मंदिर ते चाळीस फुटाची मोरी सह मुख्य धबधब्या पर्यंत ठीक - ठिकाणी दरडी व झाडे कोसळली आहेत. दरम्यान आंबोली पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने घाटमार्गातील कोसळलेली दगड हटवून वाहतूक सुरळीत केली. तसेच हिरण्यकेशी नदीला गेले चार दिवस पूर असल्याने आंबोली परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. 

रत्नागिरी : मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प 

आंबोलीत जोरदार अतिवृष्टी सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. हिरण्यकेशी पात्राबाहेर वाहत असून अनेक भागात पाणी शिरले आहे. भात, नाचनी, ऊस शेती पाण्याखाली गेली आहे. तसेच गेळे - कावळेसाद पॉइंट मुख्य रस्ता देखील हिरण्यकेशी नदीच्यापुराच्या पाण्याखाली गेला असल्याने गेळे गावचा संपर्क तुटला आहे. आंबोली - आजरा मुख्य मार्गावरील बाळेव्हाळला नदीला पूर आल्याने नांगरतासवाडी येथील पापडी पुल पाण्याखाली गेला असल्याने आंबोली - आजरा मुख्य मार्गावरील वाहतूक काहिकाळ ठप्प झाली होती. तसेच येथील गावठणवाडी येथे बोकाचाव्हाळ नदीला पूर आल्याने हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र रस्ता देखील पाण्याखाली गेला होता. मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे येथील परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोसळलेली असून गेले चार दिवस आंबोली परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. शिवाय मोबाईलचे नेटवर्क ही मिळत नाही.  

कुडाळ तालुक्यात पूरस्थिती

आंबोली घाट मार्गात अनेक ठिकाणी दरडी व झाडे कोसळली आहेत. गेल्या महिण्यातच वनविभागाच्या गाडीवर दरड कोसळली होती. यात आंबोली वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल थोडक्यात बचावले होते. तर गेले चारदिवस येथे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने बुधवारी चाळीस फुटाचा मोरी जवळील दरड घाटरस्त्यावर कोसळले. यावेळी आंबोली पोलिस व ग्रामस्थांनी दरड हटवून रस्ता मोकळा केला. 

अधिक वाचा : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे धूमशान

 "