Wed, May 19, 2021 06:03
धान्याचा ट्रक उलटून चालक ठार

Last Updated: May 05 2021 2:24AM

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी येथे ब्रेक निकामी झाल्याने ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. अपघाताची ही घटना मंगळवारी दुपारी 12.15 च्या सुमारास घडली. श्रीराम शशिकांत प्रसादे (52, रा. संगमेश्‍वर, रत्नागिरी) असे  अपघातात मृत्यू ओढवलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी तो आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-04- ईवाय-9203) मधून मासेबाव येथील  शासकीय धान्य गोडावूनमधील धान्य भरुन संगमेश्वर येथील शासकीय  गोदामाकडे जात होता. ट्रक निवळी येथील दत्त मंदिराच्या पुढील वळणावर आला असता ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने चालक प्रसादे यांच्या ताब्यातील ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटून अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकचा पूर्णपणे चुराडा झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच  ग्रामीण पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, पोलिस उपनिरीक्षक पूजा चव्हाण, पोलिस हेड कॉन्सटेबल संतोष कांबळे, अजय कांबळे व संजय झगडे यांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पूजा चव्हाण करत आहेत.