Wed, May 19, 2021 05:50
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे नवे ५९६ रुग्ण

Last Updated: May 05 2021 2:24AM

रत्नागिरी : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात मागील तीन दिवस रुग्ण संख्या कमी होत असताना मंगळवारी प्राप्‍त झालेल्या ताज्या अहवालामध्ये रुग्ण संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. मागील चोवीस तासांत 596 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे  जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या आता 24 हजार 222 वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्ण 6,537 इतके आहेत तर सोमवारी 386 जणांना घरी सोडल्याने बरे होणार्‍या रुग्णांचा आकडा 16 हजार 391 वर पोहोचला आहे. 17 जणांचा मृत्यू झाल्याने  मृतांचा आकडा 698 झाला आहे. जिल्ह्यात बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण 69.37 इतके खाली आले आहे. जिल्ह्यात मंगळवारी आलेल्या अहवालात स्वॅब टेस्टमध्ये 277 तर अँटिजेनमध्ये 319 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.