Mon, Sep 28, 2020 08:04होमपेज › Konkan › सिंधुदुर्ग : मुसळधार पावसाचा आचरा- चिंदरमधील घरांना फटका (video)

सिंधुदुर्ग : मुसळधार पावसाचा आचरा- चिंदरमधील घरांना फटका (video)

Last Updated: Jul 04 2020 5:48PM

घरात शिरलेले पाणीआचरा (सिंधुदुर्ग) : पुढारी वृत्तसेवा

पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आचरा काझीवाडा येथील घरावर आंब्याचे झाड, तर हिर्लेवाडी येथील घरांवर माड पडल्याने घरांच्या छप्परांचे नुकसान झाले. तर चिंदर देऊळवाडी येथील घराचे पूर्ण छप्पर कोसळल्याने घराच्या मातीच्या भिंतीही सततच्या पावसाने कोसळल्या. यामुळे घरातील माणसांना शाळेचा आधार घ्यावा लागला आहे. दोन दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने काही भागात पाणी साचले आहे. 

वाचा : बारामतीत एकाच दिवसात ६ पॉझिटिव्ह 

आचरा काझीवाडा येथील मुश्ताक शेख व बशिर शेख यांच्या राहत्या घरावर आंबा वृक्ष दुपारच्या सुमारास कोसळल्याने मोठे नुकसान झाले. घरावर आंबा वृक्ष कोसळल्याने मोठ्याने आवाज झाला असता घरात असलेले शरीफा मुश्ताक शेख, अल्मारशेख दिलावर शेख, बशीर नसीम काझी यांनी घराबाहेर धाव घेतली. यावेळी आवाज झाल्याचे ऐकून शेजारील दिलावर शेख, हुसेन शेख, आक्रोश शहा, जफरुल्ला काझी यानी धाव घेत फांद्या बाजूला केल्या व मदतकार्य सुरू केले. माहिती मिळताच आचरा पोलिस पाटील विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी दाखल होत घटनेची माहिती महसूल विभागाला दिली. 

शेख यांच्या घराचे अंदाजित ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. भर पावसात घरावर वृक्ष कोसळल्याने मुश्ताक काझी यांच्या संपूर्ण घरात पावसाचे पाणी साचले होते. अन्नधान्य, विद्युत उपकरणे यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आचरा हिर्लेवाडी येथील संजय लक्ष्मण खडपे यांच्या घराच्या मागच्या पडवीवर माड कोसळल्याने नुकसान आले असून घराचे  बाथरुमचे पत्रे, ६० कौलांचे नुकसान झाले आहे. तसेच हिर्लेवाडी येथील गोरखनाथ पेडणेकर यांच्या घराच्या परिसरात खाडीचे पाणी शिरले होते

वाचा : कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी डब्‍ल्‍यूएचओ चीनमध्ये जाणार!

सततच्या पावसाचा फटका चिंदर येथील दत्ताराम कदम यांच्या घराचे छप्पर कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे सुमारे ३२ हजार चारशे रुपयांचे नुकसान झाले आहे. घरामध्ये वयोवृद्ध दत्ताराम कदम व त्यांची पत्नी असे दोघेच राहतात. भर पावसात छप्पर कोसळल्याने घरातील अन्न धान्य व इतर सामांनाचेही नुकसान झाले आहे. घरच्या मातीच्या भिंती असल्याने त्याही कोसळल्याने घर धोकादायक बनले आहे. कदम व त्यांची पत्नी यांची परिस्थिती गरिबीची आहे. पत्नी मजुरी करून दोघांचा असलेला संसार चालवते. गरीब असलेल्या या कुटुंबावर संकट कोसळले आहे. घर धोकादायक झाले असल्याने चिंदर ग्रामपंचायतने कदम दांपत्याची राहण्याची तात्पुरती व्यवस्था प्राथमिक शाळेत केली आहे 
 

 "