Wed, Jun 23, 2021 01:42
कोल्हापूर : सहकारी महिला डॉक्टरला छळणाऱ्या डॉक्टरला रामलिंग फाट्यावरील हॉटेलमध्ये चोपले!

Last Updated: Jun 11 2021 8:19AM

संग्रहित छायाचित्र
हातकणंगले; पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील एका शासकीय कोव्हिड सेंटरमधील सहायक महिला डॉक्टरला नाहक त्रास दिल्याच्या कारणावरून कोव्हिड सेंटरचे प्रमुख प्रथमश्रेणी डॉक्टरला महिला डॉक्टरच्या नातेवाईकांनी रामलिंग फाट्यावरील एका हॉटेलमध्ये चोप दिला. यावेळी नागरिक व आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांनी गर्दी केली होती.

अधिक वाचा : लस घेतल्यानंतर अंगाला चिकटू लागल्या धातूच्या वस्तू

तालुक्यातील ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्याने हे प्रकरण मिटवल्याने पोलिस ठाण्यापर्यंत गेले नाही. शासकीय कोव्हिड सेंटरचे प्रमुख असलेले हे डॉक्टर मार्च 2020 पासून गेली दीड वर्षे कोरोना प्रतिबंधासाठी काम करत आहेत. या कोव्हिड सेंटर मध्ये इचलकरंजी शहरातील महिला डॉक्टर सहायक म्हणून काम करत आहेत. या महिला डॉक्टरला वारंवार कोव्हिड सेंटरचे प्रमुख असलेले हे डॉक्टर त्रास देत होते. तसेच त्यांना मानसिक त्रास होईल, असे वर्तन करत होते.

अधिक वाचा : शिरोळच्या ४७ गावांतील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाचा निर्णय ६ आठवड्यांत घ्या

होणारा त्रास या डॉक्टर महिलेने आपल्या घरी तसेच नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी या डॉक्टरची कोल्हापूर सांगली मार्गावरील रामलिंग फाटा येथे असलेल्या एका हॉटेलमध्ये चांगलीच धुलाई केली. एका ज्येष्ठ जि.प. सदस्याने मध्यस्थी करत या प्रकरणावर पडदा टाकल्याने मारहाण प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले नाही.

अधिक वाचा : खा. संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा देणार