Wed, Aug 05, 2020 18:57होमपेज › Kolhapur › आजऱ्यात वाढला समूह संसर्गाचा धोका

आजऱ्यात वाढला समूह संसर्गाचा धोका

Last Updated: Jul 04 2020 7:50PM

संग्रहित छायाचित्रआजरा : पुढारी वृत्तसेवा

आजरा तालुक्यात शनिवारी नवे तीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८७ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी सापडलेल्यांपैकी ४ रूग्ण हे स्थानिक असल्याने समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. शनिवारी आलेल्या अहवालामध्ये भादवण १ व हारूर येथील २ अशा तीन रूग्णांचा समावेश आहे.  

कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत चालल्याने कोल्हापुरात प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय!

शनिवारी सापडलेल्या रूग्णांमध्ये भादवण येथील २९ वर्षीय महिला व हारूर येथील ५४ वर्षीय महिला व ४ वर्षीय मुलीचा समावेश आहे. हे तीनही रूग्ण मुंबईहून आले असून ते आजरा येथील कोविड सेंटरमध्ये संस्थात्मक अलगीकरण होते. शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालामध्ये तालुक्यातील भादवण येथील १८ वर्षीय युवक व भादवणवाडी येथील ३८ वर्षीय पुरूष व २८ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आतापर्यंत आढळलेले कोरोनाबाधीत रूग्ण हे बाहेरून आले होते. मात्र आता कोरोनाने स्थानिकांमध्ये शिरकाव केला असून तालुकावासियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तालुक्यातील पहिला स्थानिक रूग्ण हा भादवण येथील असून ती एका डॉक्टरची पत्नी आहे. तर त्यानंतर आता त्याच गावातील १८ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. यासह भादवणवाडी येथील दोघा पती-पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. स्थानिकांमध्ये लागण झालेल्या व्यक्तींनी कोठेही प्रवास केला नसून त्यांना कोणापासून लागण झाली याची माहिती घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

कोल्हापूर : सहा तालुक्यात नव्या २३ बाधितांची भर

आतापर्यंत ८७ पैकी ७४ जण उपचार घेवून घरी परतले असून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर सध्या १२ जण सीपीआर येथे उपचार घेत आहेत. आता स्थानिक व्यक्ती आढळू लागल्याने समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. समूह संसर्गाची साखळी तोडण्याकरिता नागरिकांचे सहकार्य असणे गरजेचे असून सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.