Wed, Aug 12, 2020 00:46होमपेज › Kolhapur › आजऱ्यातील महिला कोरोना पॉझिटिव्ह

आजऱ्यातील महिला कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated: Jul 14 2020 8:47PM
आजरा : पुढारी वृत्तसेवा 

मुंबई येथून आजऱ्याला आलेली एक महिला महिला पॉझिटिव्ह आली आहे. ही महिला मुळची चंदगडची असून आपल्या मुलीसह त्या मुंबईहून ११ जुलै रोजी आल्या होत्या. दोघींचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. त्यांना आजरा कोविड केअर सेंटर येथेच ठेवण्यात आले आहे. 

यातील महिलेचा रिपोर्ट आज (दि. १४) पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्य विभाकडून योग्य ती दक्षता घेण्यात आल्याने सदर महिलेचा स्थानिक व्यक्तीशी संपर्क आलेला नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तरी देखील शहरात पहिलाच पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.