Thu, Oct 01, 2020 17:33होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : संभाजीनगरमध्ये कोरोनाग्रस्त सापडला

कोल्हापूर : संभाजीनगरमध्ये कोरोनाग्रस्त सापडला

Last Updated: Jul 08 2020 5:38PM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर शहरात पुन्हा एकदा कोरोनाग्रस्त सापडला आहे. संभाजीनगर परिसरातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, काल रिंगरोडवरील आणखी एका 73 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. त्यांचाही अहवाल सायंकाळी पॉझिटिव्ह आला. यामुळे इचलकरंजीत आणखी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

आजअखेर कोरोनाने इचलकरंजीत बळी गेलेल्यांची संख्या 6 वर गेली आहे. यासह रात्री उशिरा सीपीआरमध्ये उपचार घेत असलेल्या कर्नाटकातील 47 वर्षे महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 16 झाली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. शिरोळ तालुक्यातील 10, करवीर तालुक्यातील 6, चंदगड तालुक्यातील 4, आजरा तालुक्यातील 2, तर गडहिंग्लज तालुक्यातील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. रूईकर कॉलनी, यादवनगर आणि राजोपाध्येनगरात प्रत्येकी एक असे कोल्हापूर शहरात आणखी तीन रुग्ण आढळून आले. इचलकरंजीत दहा नव्या रुग्णांची भर पडली.

पन्हाळा तालुक्यात 1 रुग्ण आढळून आला. शिरोळमध्ये एकाच कुटुंबातील आणखी पाचजणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी बाधित आढळून आलेल्या शासकीय
कर्मचार्‍याच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यासह त्यांचा 48 वर्षीय भाऊ, 16 व 20 वर्षांचे पुतणे तसेच 85 वर्षीय चुलतीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


शिरोळमध्येच 33 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. चिपरी येथील 20 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मजरेवाडी, कुरूंदवाड येथील सांगली जिल्ह्यात बाधित आलेल्या डॉक्टरच्या 46 वर्षीय वडिलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्यांच्या भावाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, त्यांच्या भावावर मिरज येथे उपचार सुरू असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात त्याची नोंद झालेली नाही. रात्री उशिरा कुरूंदवाड येथील 24 वर्षीय, तर मजरेवाडी येथील 39 वर्षीय
पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

करवीर तालुक्यात सात रुग्ण आढळले. यापैकी चार रुग्ण गोकुळ शिरगाव येथील, तर एक रुग्ण कणेरी येथील आहे. एस.टी.च्या विभागीय कार्यालयात पॉझिटिव्ह आढळून आलेल्या गोकुळ शिरगाव येथील लिपिकाच्या आई-वडिलांसह पत्नी व आणि वहिनीलाही कोरोनाची लागण झाली आहे. 72 वर्षीय वडील, 65 वर्षीय आई, 30 वर्षीय पत्नी आणि 34 वर्षीय वहिनीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लिपिकासह दोनजण बाधित आल्याने गुरुवारपर्यंत एस.टी.चे विभागीय कार्यालय सील करण्यात आले
आहे. कणेरीत आणखी एक रुग्ण आढळला असून, 18 वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

शिये येथील क्रशरवरील आणखी एक 29 वर्षीय काम गार बाधित आढळला आहे. दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या पेठवडगाव येथील कामगाराच्या संपर्कात आल्याने हा कामगारही बाधित आला आहे. हे क्रशर सील करण्यात आले आहे. चाफोडी येथील 30 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. कोल्हापूर शहरात तीन नवे रुग्ण आढळून आले आहेत. बाधितांच्या संपर्कात आल्याने रूईकर कॉलनीत 30 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ताप-खोकल्याचा त्रास असल्याने यादवनगर येथील 85 वर्षीय वृद्धाचा स्वॅब घेण्यात  आला होता. त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राजोपाध्येनगर येथील 52 वर्षीय बँक कर्मचारीही पॉझिटिव्ह आला आहे.

काही दिवसांपूर्वी ते कामानिमित्त पुण्याला गेले होते. या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. इचलकरंजीत एका प्रसिद्ध डॉक्टरसह आणखी दहा रुग्ण आढळून आले आहेत. स्वामी मळा येथील 42 वर्षीय पुरुष, संत चौक येथील 58 वर्षीय पुरुष, सुेरू इमारत येथील 56 वर्षीय पुरुषासह सातपुते गल्‍ली येथील 35 वर्षीय महिला तसेच भाग्यश्री टॉकिज येथील 56 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यासह 75 वर्षीय वृद्धासह दत्त बालाजी चौकातील 48 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. गुरुकन्‍न नगर येथे 48 वर्षीय पुरुषासह 17 वर्षीय युवकाचा, तर जुना चंदूर रोड गोविंदनगर येथील 11 वर्षीय बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

हातकणंगले तालुक्यातील इंगळी येथे 28 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चंदगडमध्ये तांबीळवाडी येथील 55 वर्षीय पुरुषाचा, तर देवरवाडी येथील 34 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिनोळी येथे आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 20 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. भोगोली येथील 55 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजरा तालुक्यातील आरदाळ येथील 67 वर्षीय वृद्धासह त्यांच्या 64 वर्षीय पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील कौलगे येथील 75 वर्षीय वृद्धेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भुदरगड तालुक्यातील एका 70 वर्षीय वृद्धेचाही आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पन्हाळा तालुक्यातील करंजफेण येथील 65 वर्षीय वृद्धेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात 26 मार्चला पहिला रुग्ण आढळला होता. तोही पुण्याहून बहिणीकडे आलेला तरुण होता. त्यानंतर त्याच्या बहिणीलाही लागण झाली. यानंतर दि. 9 मेपर्यंत 45 दिवसांत केवळ 15 रुग्ण होते. मात्र, त्यानंतर जिल्ह्यात रेड झोनमधून आलेल्यांची संख्या वाढत गेली, त्यांचे सक्‍तीने स्वॅब घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार दररोज दीड ते दोन हजार तपासण्या करण्यात आल्या. परिणामी, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली. जिल्ह्यात पहिल्या रुग्णानंतर 45 दिवसांत झाले फक्‍त 15 बाधित जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळल्यानंतर 45 दिवस केवळ 15 रुग्ण होते. त्यापुढच्या दहा दिवसांत 19 मे रोजी जिल्ह्यातील बाधितांची संख्या 100 च्या पुढे गेली. त्यानंतर मात्र ही संख्या 200 होण्यास अवघा तीन दिवसांचा कालावधी लागला. त्यापुढे मात्र तीनचार दिवसांत रुग्णसंख्या 100 ने वाढत गेली. यामुळे 21 मे रोजी 200 पर्यंत असलेली संख्या 1 जून रोजी
600 पार गेली. अवघ्या बारा दिवसांत 400 रुग्णांची भर पडली.

जिल्ह्यात रुग्णसंख्येचा सहाशेचा टप्पा ओलांडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या सूचनेनुसार चाचण्यांचे प्रमाणही कमी केले. परिणामी, रुग्णसंख्याही कमी झाली. अवघ्या 12 दिवसांत 400 रुग्ण आढळल्यानंतर पुढच्या 11 दिवसांत (दि. 2 ते दि. 12 जून) केवळ शंभर रुग्ण आढळून आले. 1 जून रोजी रुग्णसंख्येने 700 चा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर 800 चा टप्पा ओलांडण्यास त्यानंतर पुढचे 16 दिवस लागले. 28 जूनला हा टप्पा ओलांडला. दि. 3 जुलै रोजी जिल्ह्याने बाधितांच्या एकूण संख्येचा 900 चा टप्पा ओलांडला. यानंतर अवघ्या चार दिवसांत 1 हजाराचाही टप्पा ओलांडला गेला.

 "