Sun, Aug 09, 2020 14:40होमपेज › Kolhapur › 'धारावीत कोरोना रोखला, तर संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोना कहर कसा काय'?

'धारावीत कोरोना रोखला, तर संघ मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोना कहर कसा काय'?

Last Updated: Jul 13 2020 4:34PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

मुंबईसह परिसरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्याचबरोबर आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावी भागात कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर सफाई कर्मचारी, डॉक्टर यांच्यासह इतरांनी आपला जीव धोक्यात घालून प्रयत्नांची पराकाष्ठा करत कोरोनाला हरवलं. परंतु, याचे श्रेय घेण्यासाठी आता चढाओढ सुरू आहे. यात आरएसएसचे कार्यकर्ते जीव धोक्यात घालून काम करत आहेत असं आम्ही कधीही ऐकलं नाही. परंतु याच श्रेय ते घेत आहेत. हे कितपत योग्य आहे. असा सवाल करत माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. 

मुंबईमध्ये सफाई कामगार, पोलिसांचे बळी गेलेलं आम्ही नेहमी ऐकतो आहे. परंतु, या सगळ्यात आरएसएसच्या एकाही कार्यकर्त्याचा बळी गेलेला आम्ही कधीही ऐकले नाही. याचबरोबर आरएसएसचे मुख्यालय असलेले नागपूर येथे कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्याला रोखण्यासाठी आरएसएसने कोणती ठोस उपाययोजना केली? अशी विचारणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

पुण्यात कोरोनाचा कहर या सगळ्याला रोखण्यासाठी आरएसएसमध्ये सर्वांत चांगले कार्यकर्ते काम करतात, तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र ताब्यात घ्यावा आणि त्यांनी राज्याला कोरोनामुक्त करावं असा टोला त्यांनी लगावला.