Wed, May 19, 2021 05:30
गोकुळ निवडणुक: तीसऱ्या फेरीअखेर विरोधी गटाचे १२ उमेदवार आघाडीवर तर सत्ताधारी गटाच्या ४ उमेदवारांची आघाडी

Last Updated: May 04 2021 5:39PM

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

गोकुळच्या तीसऱ्या फेरी अखेर विरोधी गटाने अद्यापही आघाडी कायम ठेवली आहे. विरोधी आघाडीकडून १२ उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी गटाचे ४ उमेदवार आघाडीवर आहेत. गोकुळ निवडणुकीत विरोधी आघाडी आणि सत्ताधाऱ्यांमध्ये क्रॉस मतदान मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अफवाही पसरत आहेत यामुळे सोशल मिडीयावर मोठा गोंधळ माजला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या गोकुळ दुध संघाची मतमोजणी जसजशी पुढे जाईल तसा निकाल स्पष्ट होत आहे. दरम्यान विरोधी पॅनेलची दुसऱ्या फेरी अखेर विरोधी गटाचे ११ उमेदवार आघाडीवर आहेत तर सत्ताधारी गटाचे ५ उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यामधील उदय पाटील, रविंद्र आपटे, बाळासाहेब खाडे, अंबरीश घाटगे, चेतन नरके यांनी आघाडी घेतली आहे. तसेच विरोधी गटाकडून विश्वास नारायण पाटील, रणजीत पाटील, शशिकांत चुयेकर, नाविद मुश्रीफ, कर्णसिंह गायकवाड, बाळासाहेब चौगुले, अरुण डोंगळे, नंदकुमार ढेंगे, अभिजीत तायशेटे, अजित नरके, उदय पाटील यांनी आघाडी घेतली आहे. 

अधिक वाचा : ब्रेक्रिंग : कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून १० दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

गोकुळच्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत महिला गटात विरोधी गटातील अंजना रेडेकर यांनी १८४ बाजी मारली तर अखेरपर्यंत पिछाडीवर असलेल्या शौमिका महाडिक यांनी सुश्मिता पाटील यांचा ४६ मतांनी पराभव केला. 

अधिक वाचा : गोकुळ निवडणूक : विरोधकांची ९, तर सत्ताधाऱ्यांची ७ जागांवर आघाडी

\संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळच्या निवडणुकीत विरोधी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाने विजयी सलामी देत राखीव गटात विजय मिळविला. अनुसूचित जाती जमाती गटातून माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी विलास कांबळे, भटक्या विमुक्त जाती जमाती गटात बयाजी शेळके यांनी विश्वास जाधव, इतर मागासवर्गीय गटात अमरसिंग पाटील आणि पी. डी. धुंदरे यांचा पराभव केला आहे. अमरसिंग पाटील यांनी ४३६, सुजित मिणचेकर यांनी ३४६ तर बयाची शेळके यांनी २३९ मतांनी विजय मिळविला.