Mon, Aug 10, 2020 22:06होमपेज › Kolhapur › वस्त्रोद्योगातील घटकांना व्याज दराची सवलत द्या, राजू शेट्टींची मागणी

वस्त्रोद्योगातील घटकांना व्याज दराची सवलत द्या, राजू शेट्टींची मागणी

Last Updated: Jul 10 2020 11:05AM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

इचलकरंजीसह राज्यातील वस्त्रोद्योग व्यवसायात विणकर समाजातील साधे यंत्रमाग, वायडिंग, सायझिंग, प्रोसेस, अ‍ॅटोलूम वस्त्रोद्योगातील घटकांना व्याज दराच्या सवलत योजनेची अंमलबजावणी करावी. तसेच सहकारी बँकांना आदेश करणेत यावेत, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली. 

अधिक वाचा :  कोल्हापूर जिल्ह्यात आणखी ९ पॉझिटिव्ह रुग्ण

यावेळी शेट्टी म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीच्या काळात विस्कळीत झालेले जनजीवन व उद्योग-व्यापार सुरळीत करून ते पुर्वपदावर आणणे गरजेचे आहे. या आपत्तीच्या काळात संचारबंदी, लॉकडाऊनचे आदेश देणेत आले. यामुळे पॉवरलूमच्या चक्रावर चालणाऱ्या वस्त्रनगरीची जनता हतबल झाली आहे. यात पॉवरलूमधारकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान अजूनही होत आहे. गेल्या काही वर्षांपासून मंदी, महागाईमुळे पॉवरलूम उद्योग मोडकळीस आला असताना कोरोनाने उद्योजगांची वाट लागली आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारने उद्योगाला मदत म्हणून बँक कर्जांचे ६ महिन्यांचे हप्ते न भरण्याचा शासन निर्णय (जीआर) जारी केला. 

अधिक वाचा :  कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र पीएसआय सचिन पाटील यांचा कोरोनाने मृत्यू 

लघू उद्योग सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी शासन कमीतकमी व्याज दराने कर्ज पुरवठा करीत असते. वस्त्रोद्योग हाही लघूउद्योगच आहे. हा उद्योग विविध करांतून शासनाला हजारो करोडोंचा महसूल देणारा व  निर्यातीतून मोठ्या प्रमाणात परदेशी चलन मिळवून देणाऱ्या या लघू उद्योगाला सध्या कमीतकमी व्याज दराने कर्ज पुरवठा करण्याची गरज असल्याचे माजी खासदार शेट्टी यांनी केली. यावेळी प्रमोद मुसळे, अमोल डाके, प्रशांत सपाटे, किरण पवार, आण्णा दबडे, सुशिल पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.