Sun, Aug 09, 2020 14:16होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला; आणखी ८ जण पॉझिटिव्ह

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला; आणखी ८ जण पॉझिटिव्ह

Last Updated: Jul 13 2020 12:21PM

File Photoकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच आहे. आज सोमवारी आणखी आठ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यात कोल्हापूर शहरातील शिवाजी पार्क येथील १, ताराबाई पार्क ३, उचगाव १ तर जिल्ह्यातील धामोड (ता. राधानगरी) येथील १ आणि कबनूर (इचलकरंजी) येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तर एक रुग्ण वाळवा (सांगली) येथील आहे.

वाचा : कोल्हापूर, इचलकरंजीत प्रत्येकी 19 कोरोनाबाधित

रविवारी ६४ रुग्ण आढळून आले होते. त्यातील १९ जण कोल्हापुरातील, तर १९ जण इचलकरंजी शहरातील आहेत. यामुळे कोल्हापूर शहरातील बाधितांची संख्या शंभरावर गेली आहे. टिंबर मार्केट, राजाराम चौकातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. एका महिला डॉक्टरचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चंदगड तालुक्यातील शिनोळी येथील दहाजणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

वाचा : कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा उतारा

जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या बाराशेच्या वर पोहोचली आहे. तर कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या २५ झाली आहे. कोल्हापूर शहरात धोका वाढला आहे. प्रारंभी उपनगरांत रुग्ण आढळून येत होते, आता शहराच्या मध्यवर्ती, उच्चभ्रू परिसरातही रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे.