पुढारी ऑनलाईन डेस्क
कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढलाय. कोरोना झाल्यानंतर ताप, सततचा खोकला, चवीची जाणीव न होणे यातील एक तरी लक्षण दिसून येतं. पण कोरोना नंतरही काही जणांना कोरड्या खोकल्याचा त्रास जाणवतो. नवीन प्रकारच्या या खोकल्याचा त्रास नेमका कशामुळे होतो हे आपण जाणून घेऊया...
याबाबत माहिती देताना होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील सांगतात की, हसताना, बोलताना, पायऱ्या चढताना जास्त ठसका येतो. त्याच्यावरुन कळतं की त्या व्यक्तीला कोरोना होऊन गेलाय. त्यालाच शॉर्ट ड्राय कफ असे म्हणतात. फुफ्फुसात संसर्ग जास्त झाला असेल तर पेशी दगडाखारख्या घट्ट होतात. त्यामुळे फुफ्फुसाची श्वासाबरोबर फुलण्याची क्षमता कमी होते. आपण ज्यावेळी हसतो, बोलतो, चालतो त्यावेळी अधिक श्वासाची गरज भासते. त्यावेळी फुफ्फुस फुलले नाही तर श्वसनमार्गाला खवखव होते. परिणामी खोकल्याद्वारे हवा बाहेर फेकली जाते. एचआरसीटी स्कोर अधिक असणाऱ्या रुग्णांमध्ये हे लक्षण बघायला मिळतं. त्यांना खूप काळ खोकला राहतो.
कोरड्या खोकल्याचे हे एक कारण...
ज्यावेळी कोरडा खोकला येतो; त्यावेळी रुग्ण तोंडाने श्वास घेण्याचा प्रयत्न करतो. यामुळे धुळीकण श्वसनमार्गात प्रवेश करतात. त्यामुळे नवीन ॲलर्जिक जन्माला येतात. कोरड्या खोकल्याचे हे एक कारण आहे.
हा करा उपाय?
फुफ्फुस फुलण्याची क्षमता वाढवली पाहिजे. ॲलर्जी विरोधात स्वतःची प्रतिकारक्षमता वाढवायला हवी. त्यासाठी दीर्घ श्वास घ्या. श्वास रोखून धरण्याचा प्रयत्न करा. प्राणायाम करा. गरम वाफ घ्या.
जेव्हा फुफ्फुसाला सूज येते तेव्हा श्वसननलिकेत कुठलीही ॲलर्जी प्रवेश करते. यामुळे श्वसननलिका आंकुचन पावते. गरम पाण्याचा वाफरा घेतल्याने ती प्रसरण पावते. परिणामी खोकला कमी होतो.
आहार काय घ्यावा?
कोरडा खोकला कमी होण्यासाठी आहारात बदल करायला हवा. थंड पदार्थ खाणे टाळावेत. बाहेर जाताना मास्कचा वापर करावा. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पांढऱ्या पेशींची जास्त गरज असते. त्यांच्या निर्मितीसाठी जीवनसत्वे हवीत. विशेषतः क जीवनसत्वाची गरज आहे. क जीवनसत्व लिंबू, चिंच, मोसंबी, संत्री या आंबट फळातून मिळते. तसेच मार्केटमध्ये क जीवनसत्व असलेल्या गोळ्यादेखील उपलब्ध आहेत, अशी माहिती डॉ. वर्षा पाटील यांनी दिली आहे.
वाचा : कसा असावा कोरोना रुग्णांचा आहार ...
वाचा : उन्हाळ्यात आहार घ्यावा कसा?
वाचा : कोरोना : जाणून घ्या... कोरोना विषाणुचं म्युटेशन (उत्परिवर्तन) कसं होतं?
वाचा : अतिलठ्ठ व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक, अभ्यासातून स्पष्ट