Sun, Aug 09, 2020 13:34होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : मौजे सांगाव येथील तरूण कोरोना पॉझिटिव्ह

कोल्हापूर : मौजे सांगाव येथील तरूण कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated: Jul 10 2020 11:34AM

संग्रहित छायाचित्रकसबा सांगाव : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे सांगाव  (ता. कागल ) येथील एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्राम समितीच्यावतीने परिसर सील करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून सात दिवस गावात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. सदरचा तरुण कोल्हापूर येथील खासगी बँकेत नोकरीला असून कामानिमित्ताने शनिवारी (ता. ४ जुलै) रोजी चंदगड तालुक्यात आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेला होता.

अधिक वाचा  ; कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र पीएसआय सचिन पाटील यांचा कोरोनाने मृत्यू 

चंदगड येथील मित्राचे वडील पॉझिटिव्ह आढळले होते. परंतू सांगावचा तरूण संपर्कात आल्याच्या कारणावरून मित्राने त्या तरूणास कोरोना टेस्ट करण्यास सांगितले होते. दरम्यान कोणतेही लक्षणे नव्हती. परंतु त्याला तपासणी करण्यास सांगितले होते. कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील मध्ये त्याने तपासणी करून घेतली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

अधिक वाचा :  वस्त्रोद्योगातील घटकांना व्याज दराची सवलत द्या, राजू शेट्टींची मागणी

गावात आई-वडिलांसह प्रथम संपर्क आलेल्या बारा व्यक्तींना कागल येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अजूनही संपर्कात आलेल्यांच्या शोध प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे. गावात प्रतिबंधात्मक औषध फवारणीचे काम सुरू आहे.