Tue, Sep 29, 2020 10:22होमपेज › Kolhapur › राधानगरीतून विसर्ग थांबला, दोन दरवाजे बंद 

राधानगरीतून विसर्ग थांबला, दोन दरवाजे बंद 

Last Updated: Aug 08 2020 9:58AM

संग्रहीत छायाचित्रराधानगरी (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा 

गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हावासियांची झोप उडवून दिली होती. मात्र जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर ओसरल्याने तर दिवसभरात बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीपच राहिल्याने काहीसा दिलासा मिळाला. गेल्या तीन दिवसांत पावसाने दिलेल्या तडाख्यात काहीसी उसंत घेतल्याने आज जनजीवन पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, आज पहाटे ५.३० वाजता राधानगरी धरणाचे गेट क्रं ६ आणि सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी गेट क्रं ३ बंद  झाले असून सध्या धरणातून ४२५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

‘अलमट्टी’चा विसर्ग वाढला; कोल्हापूरचा पूर स्थिरावला

गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेने अवघ्या दोन दिवसांत धोक्याची पातळी ओलांडली. पंचगंगेला महापूर आला, त्यात राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले आणि त्यातून ७, ११२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. त्यामुळे शहरातील नागरी वस्तीतही पाणी शिरण्यास सुरुवात झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. अनेकांनी गुरुवारची रात्र जागुण काढली. मात्र, शुक्रवार सकाळपासून शहरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान शुक्रवार रात्री आणि शनिवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतल्याने राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद झाले आहेत. धरणातून होणारा पाण्याचा विसर्गही कमी झाल्याने पाणी पातळीत वाढ झालेली नाही. त्यामुळे रात्री वाढलेले पाणी आज सकाळपासून आहे त्या ठिकाणी स्थिरावले आहे.

 

 "