Tue, Sep 29, 2020 09:08होमपेज › Kolhapur › पंचगंगेच्या पाणी पातळीत किंचित घट, १० बंधारे खुले 

पंचगंगेच्या पाणी पातळीत किंचित घट

Last Updated: Aug 08 2020 10:24AM

संग्रहीत छायाचित्रकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

गेल्या तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने जिल्हावासियांची झोप उडवून दिली होती. मात्र जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी सकाळपर्यंत पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. आज शनिवारी सकाळपासून पावसाने काहीसी उसंत घेतल्याने तर राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बंद झाल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत ४ इंचाने घट झाली असून आणखी १० बंधाऱ्यावरील पाणी कमी झाले असून त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. त्यामुळे आज जनजीवन पूर्वपदावर येताना दिसत आहे. 

राधानगरीतून विसर्ग थांबला, दोन दरवाजे बंद 

जिल्‍हा आपत्‍ती व्यवस्‍थापन कक्षाच्या माहितीनुसार आज (शनिवार) सकाळी ९ वाजेपर्यंत राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी ४४ फूट ६ इंच इतकी झाली आहे. ही पाणी पातणी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४४ फूट १० इंचावर पोहोचली होती. पावसाने थोडी उसंत दिल्याने पंचगंगेच्या पाणीपातळीत ४ इंचाने घट झाली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट असून धोका पातळी ४३ फूटांची आहे. अजूनही पंचगंगा धोका पातळीवर असून ८५ बंधारे पाण्याखाली आहेत. 

Image

Image

Image

अलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडले

 "