Sat, Aug 15, 2020 16:41होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : ऑनलाईन अभ्यासाच्या तणावाने विद्यार्थीनीची आत्महत्या

कोल्हापूर : ऑनलाईन अभ्यासाच्या तणावाने विद्यार्थीनीची आत्महत्या

Last Updated: Jul 16 2020 5:10PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

ऑनलाईन शिकवणीचा अभ्यास समजत नसल्याच्या नैराश्येतून बी फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने स्वत:चे जीवन संपवले. गुरुवारी घरात कोणीही नसल्याचे पाहून तिने फॅनला साडीने गळफास घेतला. गेले पाच-सहा दिवस ती नैराश्यामध्ये होती, असे पालकांनी पोलिसांना सांगितले. ऐश्वर्या बाबासो पाटील (वय 20, रा. वाशी, ता. करवीर ) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. 

सूर्यास्तानंतर पहा अनोखा धूमकेतू

एैश्वर्या सध्या बी फार्मसीचे शिक्षण घेत होती. कॉलेज बंद असल्याने सध्या ऑनलाईन शिकवणी सुरु होती. पण अभ्यास तिच्या लक्षात येत नसल्याने ती नैराश्येत होती. पाच - सहा दिवसांपासून ती दडपणाखाली असल्याचे पालकांना जाणवले. गुरुवारी घरात कोणी नसल्याचे पाहून तिने सिलींग फॅनला गळफास लावून घेतला. फास सोडवून तिच्या कुटूंबियांनी तिला शासकीय रुग्णालयात आणले. परंतु उपाचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे.