Wed, May 19, 2021 04:15
गोकुळमध्ये सामान्य कार्यकर्त्यांला सतेज पाटील यांच्यामुळे संधी, बयाजी शेळकेंना भावना अनावर

Last Updated: May 04 2021 7:14PM

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दुध संघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महाडिक आणि पी एन पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे. गोकुळची सत्ता महाडिक अभादीत ठेवतील असे बोलले जात असताना सतेज पाटील आणि मुश्रीफ यांनी चांगलेच वर्चस्व प्राप्त केले आहे. दरम्यान भटके-विमुक्त प्रवर्गातून बयाजी शेळके यांनी 346 मतांनी विजय मिळवला. 

अधिक वाचा : गोकुळ निवडणुक: विद्यमान अध्यक्ष रविंद्र आपटे पराभवाच्या छायेत

बयाची शेळके यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ते निवडून आल्याने जिल्ह्यात त्यांच्या नावाची चांगलीच चर्चा होत आहे. ३४६ मतांनी विजय मिळवत एका सामान्य कार्यकर्त्याला सतेज पाटील यांनी मोठे केलं आहे. सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता आज गोकुळच्या संचालक पदापर्यंत पोहोचण्यास मदत मला सतेज पाटील यांनी केली. दरम्यान या विजयानंतर प्रतिक्रिया देताना बयाजी शेळके यांना भावना अनावर झाल्या.

अधिक वाचा : गोकुळ निवडणुक: तीसऱ्या फेरीअखेर विरोधी गटाचे १२ उमेदवार आघाडीवर तर सत्ताधारी गटाच्या ४ उमेदवारांची आघाडी

गोकुळच्या चौथ्या फेरीअखेर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाच्या १३ उमेदवारांनी आघाडी कायम ठेवली आहे. तर सत्ताधारी गटाच्या ३ जागा आघाडीवर आहेत. दरम्यान विद्यमान चेअरमन रविंद्र आपटे पराभवाच्या छायेत आहेत. यामुळे विरोधी गटाची गोकुळवर मजबूत पकड होताना दिसत आहे. तसेच विरोधी गटाकडून विश्वास नारायण पाटील, रणजीत पाटील, शशिकांत चुयेकर, नाविद मुश्रीफ, कर्णसिंह गायकवाड, बाळासाहेब चौगुले, अरुण डोंगळे, नंदकुमार ढेंगे, अभिजीत तायशेटे, अजित नरके, उदय पाटील यांनी आघाडी घेतली आहे.