Wed, Aug 05, 2020 18:40होमपेज › Kolhapur › ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचे या आठवड्यातील सर्व कार्यक्रम रद्द

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफांचे या आठवड्यातील सर्व कार्यक्रम रद्द

Last Updated: Jul 15 2020 4:25PM
कोल्‍हापूर : पुढारी वृत्‍तसेवा 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे शुक्रवार (ता.१७) ते सोमवार (ता.२०) हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर होते. दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे या आठवड्यातील सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. तसेच या आठवड्यात ते कुणालाही भेटणार नसल्‍याचे त्‍यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. शुक्रवार (ता.१७) ते सोमवारचा (ता.२०) कालावधी हा कोल्हापूर जिल्ह्य दौऱ्यासाठी मुश्रीफ यांच्याकडून राखीव होता. 

या पूर्वनियोजित कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद सदस्यांना टॅबचे वाटप, गडहिंग्लज व उत्तूर येथे भेटी, शासकीय बैठका, वैयक्तिक गाठीभेटी असे सर्वच कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत.

दरम्यान, आत्ता बदल्यांचा काळ सुरू आहे. ज्यांना बदल्यांची पत्रे द्यावयाची असतील, तसेच महत्त्वाची कामे असतील त्यांनी कागलमध्ये हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या कार्यालयात उदय पाटील व संदीप बोभाटे तसेच कोल्हापूरमध्ये कावळा नाका शासकीय विश्रामगृह येथील कार्यालयीन अधीक्षक सचिनकुमार मठपती यांच्याकडे द्यावीत. असे सांगण्यात आले आहे. पुढच्या आठवड्यात मुश्रीफ मुंबईला गेल्यानंतर त्या -त्या संबंधित मंत्रीमहोदयाकडे ही पत्रे देऊन, त्याची पोहोच दिली जाईल असे सांगण्यात आले आहे.