Wed, Oct 28, 2020 11:52होमपेज › Kolhapur › रेमडेसिवीर मिळणार आता 2396 रुपयांत

रेमडेसिवीर मिळणार आता 2396 रुपयांत

Last Updated: Oct 19 2020 12:48AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

सर्वसामान्य लोकांसाठी शासनाने आता कमी दरात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध केले आहे. 2 हजार 396  किंमत निश्‍चित केली आहे. कमी दरात रेमडेसिवीर देण्यासाठी शासनाने राज्यभरात औषध विक्रेत्यांची निवड केली असून कोल्हापुरातील दोन  विक्रेत्यांचा  समावेश आहे. यासंदर्भात शासनाने परिपत्रक काढले आहे.

पूर्वी हे इंजेक्शन महाग होते. परंतु कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर शासनाने या औषधाच्या किमती हजार ते दीड हजार रुपयांनी कमी केल्या. उत्पादन घेणार्‍या मोजक्या चार ते पाच कंपन्या आहेत. त्यांच्या दरामध्ये तफावत आहे.   इंजेक्शनचा कमीत कमी दर 2800 रुपये इतका आहे. बाधितांची संख्या वाढल्यामुळे या इंजेक्शनची मागणी वाढली आणि त्याचा तुटवडा निर्माण झाला. तेव्हा काही औषध विक्रेत्यांनी  इंजेक्शन चढ्या भावाने विकले. 

सध्या ज्या भावाने विक्री होती, ती रक्‍कम देखील अधिक आहे. म्हणून सरकारने किंमत आणखी कमी केली आहे. त्यासाठी शासनाने विक्रेते निश्‍चित केले आहेत. पुणे विभागात 13 विक्रेते निश्‍चित केले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 4, सातारा जिल्ह्यात 4, सोलापूर जिल्ह्यात 1, सांगली जिल्ह्यातील 2 व कोल्हापूर जिल्ह्यातील दोन औषध विक्रेत्यांचा समावेश आहे.

कोल्हापुरातील मे. एसएमबीटीएस ट्रस्ट प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र, दसरा चौक व साई मेडिकल शाहूपुरी पाचवी गल्‍ली येथे वाजवी दरातील रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 "