Sun, Aug 09, 2020 13:33होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने २ मार्ग बंद

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने २ मार्ग बंद

Last Updated: Jul 08 2020 12:00PM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील १ राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग १ असे २ मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली. करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे, साळोखेनगर, बालिंगे, शिंगणापूर, राज्य मार्ग १९४ रस्त्यावर १ फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून आंबेवाडी, चिखली मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे. 

अधिक वाचा :  फडणवीसांच्या स्वीय सहाय्यकांना कोरोनाची लागण

आजरा तालुक्यातील जिल्हा मार्ग ५२ पासून नवले देवकांडगाव, कोरिवडे, पेरणोली, साळगाव राज्य मार्ग १८८ ला मिळणाऱ्या प्रजिमा साळगाव बंधाऱ्यावर अर्धा फूट पाणी आल्याने वाहतूक बंद असून इजिमा १३२ सोहाळे मार्गे वाहतुक सुरू आहे.