Sun, Jan 17, 2021 11:04‘कस्तुरी क्लब’तर्फे पास्ता मेकिंग कार्यशाळा

Last Updated: Nov 28 2020 2:10AM
कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा

दिवाळी नुकतीच झाली आहे आणि फराळाचे पदार्थ खाऊन आपल्या सगळ्यांनाच कंटाळा आला आहे. काहीतरी चटपटीत आणि वेगळ्या चवीचे मस्त पदार्थ चाखता आले तर घरातल्या मुलांसह सगळेच खूश होऊन जातील. म्हणूनच कस्तुरी क्लबमार्फत पास्ता मेकिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. 

कार्यशाळा शनिवार दि. 5 डिसेंबर रोजी दु. 2.30 वाजता होणार असून कार्यशाळेत रेड सॉस पास्ता, व्हाईट सॉस पास्ता, वेजी पास्ता, पेस्टो पास्ता, लाझानिया, पिंक सॉस पास्ता, पेने, बेक मकरोनी चीझ इत्यादी प्रकार शिकवले जाणार आहेत.

कार्यशाळेचे प्रशिक्षण संज्योत दप्तरदार या देणार असून गेली अनेक वर्षे त्या महिलांना पाककलेचे प्रशिक्षण देत आहेत. या कार्यशाळेसाठी 350/-रु. शुल्क असून पूर्व नावनोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुकांनी 3 डिसेंबरपर्यंत नावे फी भरून नोंदवणे आवश्यक आहे. कार्यशाळेस फक्त 30 महिलांना प्रवेश मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : टोमटो एफ. एम. वसंत प्लाझा, बागल चौक कोल्हापूर. मोबा. नं.8483926989 किंवा 9096853977. 

महत्त्वाची सूचना : कार्यशाळेस येताना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक.