Tue, Sep 29, 2020 09:23होमपेज › Kolhapur › पंचगंगा धोका पातळीच्या खाली

पंचगंगा धोका पातळीच्या खाली

Last Updated: Aug 09 2020 2:43PM

पंचगंगा नदीकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली होती. जिल्ह्यात पडणाऱ्या पावसामुळे पंचगंगेने धोक्याची ओलांडली होती. मात्र, रविवारी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने तर राधानगरी धरणाचे दरवाजे बंद झाल्यामुळे पंचगंगा नदी धोका पातळीच्या खाली आली आहे. कोल्हापूरवासीयांना पूराच्या धोक्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

‘राधानगरी’चे दरवाजे बंद, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट

दरम्यान रविवारी दुपारी एक वाजता पंचगंगेची पातळी धोका पातळीच्या खाली आली. दुपारी बारा वाजता ४३ फुट १ इंचावर असलेली पाणी पातळी एक वाजता ४२ फूट ११ इंचापर्यंत खाली आली. समाधानकारक बाब म्हणजे पाणी पातळी कमी होत असल्याने कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील पाणी ओसरू लागले आहे.

 "