होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर जिल्‍ह्यात आज पुन्हा ४६ रुग्णांची भर

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात आज पुन्हा ४६ रुग्णांची भर

Last Updated: Jul 11 2020 4:25PM
कोल्‍हापूर : पुढारी वृत्‍तसेवा

कोल्‍हापूर जिल्‍ह्यात गेल्‍या काही दिवसांमध्ये कोरोनाग्रस्‍त रूग्‍णांची संख्या वाढतच चालली आहे. आज पुन्हा जिल्‍ह्यात नव्याने ४६ रूग्‍ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे जिल्‍ह्यातील आरोग्‍य यंत्रणा सतर्क झाली आहे. 

आज जिल्‍ह्यातील हातकणंगलेतील साजणी तसेच चिंचवाड मधील कोरोची गल्‍ली या ठिकाणी प्रत्‍येकी १ तसेच इचलकरंजीतील सोणगे मळा येथील ३ तसेच करवीरमधील वळीवडे येथील २ तसेच गोकुळ शिरगावमध्ये ३ तर परिते मध्ये १ कोरोनाग्रस्‍ताचा समावेश आहे. तसेच कोल्‍हापूर शहरातील फुलेवाडी येथे २ तसेच मंगळवार पेठेतील १ व्यक्‍ती पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे जिल्‍ह्यासह कोल्‍हापूर शहरातील अंतर्गत भागातही कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्‍याचे दिसून येत आहे.