Fri, Sep 25, 2020 18:50होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात आमदार कोरोनाबाधित

कोल्हापूर जिल्ह्यात आमदार कोरोनाबाधित

Last Updated: Aug 14 2020 5:04PM

संग्रहीत छायाचित्रइचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यातील वस्त्रनगरी म्हणून नावलौकीक असणाऱ्या इचलकरंजीत कोरोना कहर सुरू असून इचलकरंजी कोरोनाचा हॉटस्पाट बनला आहे. आता आमदार प्रकाश आवाडे यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

कोल्हापुरात सतेज पाटील- महाडिक कार्यकर्ते आले आमने-सामने; घोषणाबाजीने काही काळ तणाव

याच्या आधीही आवाडेंच्या घरात कोरोनाने शिरकाव केला होता. दरम्यान रात्री १२ पासून सायंकाळ ४ पर्यंत जिल्ह्यात २१६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. काल (गुरुवारी) २४ तासांत कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला होता, तर ६४० रूग्णांची भर पडली होती. आजअखेर कोरोनामुळे जिल्ह्यातील ३६२ जणांचा मृत्यू झाला असून ५१६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कालपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा १३ हजार १९६ होता. त्यापैकी ७ हजार ३१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 "