Tue, Sep 29, 2020 18:57होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र पीएसआय सचिन पाटील यांचा कोरोनाने मृत्यू 

कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र पीएसआय सचिन पाटील यांचा कोरोनाने मृत्यू 

Last Updated: Jul 10 2020 9:45AM
जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यातील उदगावचा (ता. शिरोळ) सुपुत्र, सध्या मुंबई येथील विक्रोळी पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक सचिन दिनकर पाटील (वय ४१) यांचा गुरुवारी (ता.९) कोरोनाने मृत्यू झाला. दरम्यान पाटील यांची पत्नी व मुलगा यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर उदगाव येथे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

अधिक वाचा :   कोल्हापूर जिल्ह्यात आणखी ९ पॉझिटिव्ह रुग्ण

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वृद्ध सेवानिवृत्त वडील दिनकर गुरुजी, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे. चार दिवसांपासून त्यांना त्रास होऊ लागल्यानंतर उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यांचा एक लहान भाऊ सन २०१० साली पोलिस सेवेत असताना त्यांची निवड पोलिस उपनिरीक्षक पदी झाली होती. नाशिक येथे ट्रेनिंग सुरू असताना हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. पाटील कुटुंबावर सचिन यांच्या मृत्यूने दुसरा आघात झाला. उदगाव येथे शोककळा पसरली आहे.

 "