Sat, Aug 08, 2020 15:00होमपेज › Kolhapur › ‘कस्तुरीं’नी लुटला बहारदार गीतांचा आनंद

‘कस्तुरीं’नी लुटला बहारदार गीतांचा आनंद

Published On: Feb 05 2019 2:41PM | Last Updated: Feb 05 2019 2:41PM
गडहिंग्लज: प्रतिनिधी
लावणीपासून प्रेमगीतापर्यंत.. ‘मेरे सपनो की राणी’पासून ‘झिंगाट’पर्यंत एकापेक्षा एक हिंदी-मराठी गीतांच्या आस्वादाने ‘कस्तुरी’ चिंब झाल्या. निमित्त होते दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबतर्फे आयोजित आणि अली जाफर प्रस्तूत ‘एक हसीन सफर’ या गाण्यांच्या कार्यक्रमाचे. गडहिंग्लज पालिकेच्या शाहू सभागृहात रविवारी कार्यक्रम पार पडला. 

नगरपरिषदेच्या बांधकाम सभापती नाज खलिफा, नगरसेविका क्रांतिदेवी शिवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. अली जाफर यांच्या ‘एक दंताय’ व कस्तुरी सदस्या गीता पाटील यांच्या ‘मेरा कर्मा तू’ या देशभक्‍तीपर गीताने झाली. कस्तुरी क्‍लबच्या सदस्यांनी टाळ्यांच्या प्रतिसादात उत्स्फूर्त दाद दिली. यानंतर ‘बादशाहो’ या चित्रपटातील ‘मेरे रश्के कमर’ या सभासदांच्या आवडीच्या गीताला चांगलीच दाद मिळाली. कोमल कांबळे हिने ‘अधीर मन झाले’ आणि ‘रेशमाच्या रेघांनी..’ गीताचे उत्स्फूर्तपणे सादरीकरण केले. 

‘आवाज वाढीव डीजे’ आणि ‘सैराट’मधील ‘झिंगाट’ गाण्यावर महिला सभासदांनी ताल धरला. कोमल कांबळे हिने ‘अप्सरा आली’, ‘मला लागली कुणाची उचकी’ या गाण्यावर लावणी नृत्य सादर केले. मो. युसूफ यांनी ‘गुलाबी आँखे’ गाणे सादर करून सर्वांना मोहम्मद रफींच्या जमान्यात नेले. मोहम्मद फय्याज यांच्या मिमिक्रीला मोठी दाद मिळाली. तब्बल तीन तास सुरू असलेल्या चित्रपटगीतांमध्ये ‘कस्तुरी’च्या सभासद रममाण झाल्या होत्या. अनिकेत पाटील यांनी ध्वनियंत्रणेची जबाबदारी सांभाळली.

पाच जणी ठरल्या लकी ड्रॉच्या मानकरी

यावेळी कस्तुरी क्‍लबतर्फे यावर्षीचा पहिलाच लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये वर्षा देऊळकर, वंदना आडावकर, नीलांबरी भुईंबर, स्नेहा चव्हाण, मीनाक्षी पाटील, सानिका लोहार या बक्षिसाच्या मानकरी ठरल्या. त्यांना श्रुंगार डिपार्टमेंटल स्टोअर्सतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. यानंतर फनिगेम्सचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनाही ‘श्रुंगार’तर्फे बक्षिसे देण्यात आली.

सनरेज, शहा स्टीलतर्फे हळदी-कुंकू वाण

यावेळी हळदी-कुंकू कार्यक्रमही पार पडला. यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक सभासद महिलेला सखी पार्लरकडून मोफत मेहंदी काढण्यात आली. सनरेज इंडस्ट्रीज सुळे व शहा स्टील सेंटर व प्रेझेंटेशन आर्टिकल्स यांच्याकडून सभासदांना वाण देण्यात आले.