Wed, May 19, 2021 05:03
महाराष्ट्राची तंत्रभरारी -आ़य. टी. उद्योगातील संधी 

Last Updated: May 01 2021 1:23PM

- महेश कोळी, संगणक अभियंता 

 आधुनिक काळात अर्थव्यवस्थेचा बव्हंशी विकास हा विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विकासावर आधारित असतो. महाराष्ट्राची निमिर्ती झाली तेव्हा आजच्या काळात दिसणार्‍या तंत्रज्ञानाचा उगमही झालेला नव्हता. मात्र, तरीही महाराष्ट्राची उभारणी करणार्‍या नेतृत्वाने, इथल्या जिज्ञासूंनी, समाजासाठी धडपडणार्‍यांनी, प्रतिभावंतांनी ओण तंत्रज्ञांनी आपापल्या परीने योगदान देत, पाठपुरावा करत नवनवीन तंत्रज्ञानाने महाराष्ट्राला समृद्ध करण्याचे काम केले.   परिणामी आज भारतात जी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती झाली आहे. त्यात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे दिसून येते.

देशाच्या माहिती तंत्रज्ञानातील़ एकूण उत्पन्नापैकी महाराष्ट्राचे  योगदान 20 टक्क्यांहून अधिक आहे. पुण़्यासारख़्या शहराची एकेकाळी ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख होती. ती आता माहिती तंत्रज्ञानाताल एक प्रमुख शहर म्हणूनही ओळख आहे. केवळ पुणेच नव्हे तर गेल्या दशकभराच्या काळात नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आदी भागातही माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्राचा विस्तार झालेला आहे.  

सॉफ्टवेअर नियार्तीच़्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात कर्नाटकानंतर दुसरा क्रमांक आहे. भारतात सॉफ्टवेअर टेक्नाॅलॉजी पार्कची रचना माहिती-तंत्रज्ञान खात्याने केली असून, माहिती-तंत्रज्ञान व संदेशवहन मंत्रालयांतर्गत याचे कार्य 1991 पासून चालते. सॉफ्टवेअरची निर्यात करणे, रोजगार देणे, संगणक पुरवठा करणे हा याचा उद्देश आहे. भारतातील सॉफ्टवेअर टेक्नाॅलॉजी पार्कस् महाराष्ट्रात 1990 मध्ये सुरू करण्यात आला. आज हाराष्ट्र अशा पार्कअंतर्गत सॉफ्टवेअरची निर्यात करणारे देशातील दुसरे राज्य आहे. 2008 हे वर्ष महाराष्ट्र्राने ‘माहिती-तंत्रज्ञान वर्ष’ म्हणून साजरे केले होते. महाराष्ट्र सरकारने 2011 मध्ये माहिती-तंत्रज्ञान धोरणाला मंजुरी दिली. डॉ. विजय भटकर यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशींनुसार हे धोरण निश्‍चित करण्यात आले. गेल्या काही वर्षांत राज्याच्या शासन-प्रशासनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत आहे. ई-गव्हर्नन्समुळे नागरिकांना अनेक कामांसाठी सरकार दरबारी हेलपाटे घालण्याच्या जाचातून मुक्तता मिळत आहे. आज मोबाईल आणि इंटरनेट वापरामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. महाराष्ट्रात स्मार्टफोन वापरणार्‍यांची दर हजारी प्रमाण देशातील सवार्धिक आहे. 

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणार्‍या कृषी क्षेत्रातही गेल्या 50-60 वर्षांत तंत्रज्ञानाचा वापर वाढत गेल्याचे दिसते. आज राज्यातील शेतकर्‍यांना मोबाईल फोनवर हवामानाच्या अंदाजापासून ते बाजारभावापयर्ंतची सर्व माहिती क्षणार्धात मिळते. तसेच शासनाच्या विविध योजनांविषयीचा तपशीलही शेतकर्‍यांना मोबाईलवर मिळत असतात. दुसरीकडे, प्रत्यक्ष शेतातही तंत्रज्ञानाचा वापर पूर्वीच्या तुलनेत कमालीचा वाढत गेला आहे. याचा फायदा श्रम, वेळ आणि खर्च यांची बचत होण्यात झाला असून, त्यातून शेतकर्‍यांना लाभच होत आहे. कृषी क्षेत्राबरोबरचं शिक्षण, आरोग्य, बॅंकिंग, न्यायप्रणाली अशा सर्वच क्षेत्रांत देशभरात तंत्रज्ञानाने जी प्रगती साधली, त्यामध्ये महाराष्ट्र मागे राहिलेला नाही. 

माहिती तंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग लॉकडाऊनच़्या काळातही झाला. महाराष्ट्रांनाचं ग्रामीण भागातील स्व़यंसहाय्यता गटातील दहा हजारांपेक्षा जास्त जणांनी राज्य आणि केंद्र शासनाच्या महिलांसाठीच़्या योजनांबाबत ऑनलाईन प्रशिक्षण घेतले. ही किमया महाराष्ट्र राज़्य ग्रामीण जीवन्नोनती अभ़ियानाने केली. विशेष म्हणजे असे प्रशिक्षण देणारे देशातील महाराष्ट्र हे पहिले राज़्य ठरले. आज जगभरातील  बहुराष्ट्रीय संगणक उद्योग भारतातील आऊट सोसिर्ंग क्षेत्रातील तेजीचा फायदा घेण्यासाठी सरसावत आहेत. त्याचप्रमाणे अनेक कंपन्या त्यांचे सॉफ्टवेअर संशोधनाचे काम भारतीय उद्योगांना आऊटसोर्स करत आहेत; तर बाकीच्या भारतात त्यांचे अस्तित्व निर्माण करत आहेत आणि सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील अनेक टेक्नो कंपन्यांचा समावेश आहे. 

माहिती तंत्रज्ञान आणि त्यावर आधारित सेवा व उद्योगांमधील नियार्तीच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात दुसऱ्या स्थानी आहे, तर महाराष्ट्रात पुणे प्रथम क्रमांकावर आहे. कोरोना व लॉकडाऊनचा आ़यटी व आ़यटी आधारित सेवा उद्योगांवर फारसा प्रभाव पडला नाही. पुणे विभागांतर्गत सॉफ्टवेअर टेक्नाॅनॉलॉजी पार्क ऑफ इंड़ियाच्या पुणे विभागातील 927 संस्थांकडून गतवर्षी लॉकडाऊनच़्या दोन महिऩ्यांच्या काळात 18 हजार कोटी रु़पयांची नियार्त करण़्यात आली आहे. सॉफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी पार्कची स्थापना  झाल़्यानंतर 1991 मध्ये या तिन्हीचे एकत्रीकरण करत सॉफ्टवेअर टेक्नालॉजी पार्क ऑ इंड़ियाची (एसटीपीआ़य.) स्थापना करण़्यात आली. एसटीपीआ़यच्या पुणे विभागांतर्गत 2018-19 मध्ये 879 युनिट्सच़्या माध़्यमातून 85 हजार 163 कोटी रु़पयांची नियार्त नोंदली गेली होती, तर त़्या वर्षात या विभागांतर्गत येणाऱ्या युनिट्समध्ये साडचार लाख कमर्चारी कायर्रत होते. सन 2019-20 मधील अंदाजित नियार्त सुमारे 93 हजार कोटी रु़पये किंवा त़्याहून अधिक असण़्याची शक्यता आहे.  आ़यटी, आ़टीईएस क्षेत्राचा विकास वेगाने होत राहील व लवकरच पुणे विभागातील नियार्त एक लाख कोटी रु़पयांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. 

देशात एकूण आ़यटी उलाढालीत महाराष्ट्राचा वाटा मोलाचा असला तरी आ़यटी. उद्योग विस्ताराच़्या बाबतीत भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रात बरीच विषमता आहे. त्यामुळे येणार्‍या काळात मुंबई-पुण्याप्रमाणेच नागपूर, सांगली, कोल्हापूर, नाशिक, ही शहरे संगणक प्रणाली केंद्र म्हणून विकसित करण्याची गरज आहे. वीज, रस्ते, सार्वजनिक दळणवळणाची साधने, विमानतळ यांसारख्या सुविधा राज्यातल्या या प्रमुख शहरांत आधुनिक रूपात विकसित करण्याची गरज आहे. 

सततच़्या अस्मानी संकटांमुळे मराठवाड्यासारख्या प्रदेशाचे राज़्याच्या सकल उत्पन्नात योगदान जेमतेम दोन टक्क्यांचे आहे. अशा परिस्थितीत हे आ़यटी  इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्य़ाचे नवीन उद्योगधंदे अशा का़यमच्या दुष्काळी प्रदेशात चालू केले तर रोजगार निमिर्ती होऊन उपासमारीचा प्रश्‍न सुटण़्यास मदत होऊ शकते. या उद्योगांना पारंपरिक उद्योगांनाच्या मानाने पाणीही खूप कमी लागते. 
माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुरेसे कुशल मनुष्यबळ पुरवण़्यासाठी नॅसकॉमने लघू, मध्यम आणि लांब पल्ल्यांच्या योजिना सुचविल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर कुशल तंत्रज्ञांच्या कायर्क्षमतेते वाढ कशी करता येईल, त्याचे प्रयोजन करणे, आय. टी. उद्योगाचा विस्तार मध़्यम किंवा लहान शहरात वाढवणे आणि त्यायोगे खर्चात बचत होईल, अशा काही योजनांवर तातडीने भर देण्याची गरज आहे. मध्यम पल्ल्यांच्या योजनांचा भर कुशल तंत्रज्ञ त़यार करण़्यासाठी लागणारा प्रशिक्षण कालावधी कमी कसा करता येईल,  तसेच अशा कुशल तंत्रज्ञांची माहिती एकत्र कशी करता येईल, यावर आहे. 

महाराष्ट्रात स्टार्ट अप योजनांना चांगला प्रतिसाद मिळत असून, आता अधिकाधिक युवा वर्ग स्टार्टअपकडे वळत आहे. 2019 मध्ये देशात नोंदणी केलेल्या एकूण 21 हजार 548 स्टाटर्अपैकी 8,402 म्हणजेच सवार्िधक स्टार्टअप्सची नोंदणी महाराष्ट्रात झाली होती. राज़्यातील संसाधनाचा उ़पयोग करण़्यासाठी स्टार्टअप काम करत आहे. नवीन तंत्रज्ञान तसेच नवनवीन संकल्पनांवर आधारित नवीन उद्योजक महाराष्ट्रात घडावेत, यासाठी स्टार्टअपला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. बाजारपेठांची मागणी लक्षात घेऊन त्यांच्या उन्नतीसाठी आटिर्फिशिअल इंटिलिजन्स, बि डेटा अ‍ॅनालिसस, रोबोटिक्स, थ्रीडी प्रिंटिंग आणि इतर यांसारख़्य़ा भविष़्यातील क्षेत्रातील कौशल़्य प्रदान करणे आवश्यक आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत आहेत. आज देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेपुढे रोजगारनिमिर्तीचे प्रचंड मोठे आव्हान आहे. त्यादृष्टीने विचार करता माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करण्यावर भर द्यायला हवा.