Wed, Aug 05, 2020 19:22होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : महाराष्ट्राची चेरापुंजी 'किटवडे'त पावसाची संततधार सुरूच

कोल्हापूर : महाराष्ट्राची चेरापुंजी 'किटवडे'त पावसाची संततधार सुरूच

Last Updated: Jul 04 2020 7:38PM

संग्रहित छायाचित्रसोहाळे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आजरा तालुक्यातील किटवडे परिसरात जून महिन्यात १४०६ मि.मी. पाऊस पडला आहे. हा पाऊस गतवर्षातील जून महिन्यापेक्षा जादाच झाला आहे. सध्या या परिसरात पाऊस सुरु असून गेले दोन दिवस अतिवृष्टी झाली आहे. पावसामुळे भातरोप लावणीसह इतर शेतीकामांना वेग आला आहे.  

कोल्हापूर : सहा तालुक्यात नव्या २३ बाधितांची भर

आंबोलीपासून अलीकडे ११ ते १२ कि.मी. अंतरावर आजरा तालुक्यातील किटवडे हे गाव असून मुख्य रस्त्यापासून सहा कि.मी. अंतरावर वसले आहे. गावच्या तीनही बाजूला डोंगर तर एका बाजू खुला भाग आहे. हा खुला असलेला भाग आंबोली परिसरासह कावळेसादकडील आहे. येथूनच जोराचा वारा व पाऊस थेट गावावरच येतो. त्यामुळे या परिसरात दरवर्षी पावसाळ्यात ढगफुटीसारखा पाऊस पडतो. अनेकवेळा निसर्गाचा रुद्रावतार या परिसरातील लोकांनी अनुभवला आहे. पावसाळ्यात तीन महिने या गावातील लोकांना घराबाहेर पडणे केवळ अशक्य असते. 

कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढत चालल्याने कोल्हापुरात प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय!

पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या परिसरातील नागरिकांनी घरात पावसाळ्यापुर्वीच आवश्यक ती शिधा साठवून ठेवलेली असते. गतवर्षी गेल्या १५ वर्षातील उच्चांकी पाऊस या परिसरात झाला असून पाच महिन्यात तब्बल ७८२४ मि.मी. पावसाची नोंद येथे झाली आहे. सन १९८४ ला ९५०० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर गतवर्षी सात हजार मि.मी. च्या पुढे पाऊस झाला आहे. किटवडे येथे असणार्‍या पर्जन्यमापन केंद्रावर रामचंद्र धोंडीबा सावंत हे पर्जन्य मापक सकाळी व संध्याकाळी दररोज पावसाचे प्रमाण मोजतात. तहसिल कार्यालयाकडे नोंद असणार्‍या आजरा तालुक्यातील जून महिन्यातील सरासरी पावसाचा विचार केल्यास १ हजार मि.मी. पाऊस किटवडे परिसरात जादा झाला आहे. 

इचलकरंजीत बड्या नेत्याच्या घरात कोरोनाचा शिरकाव; मुलासह नातवाला लागण 

तालुक्यात आजअखेर सरासरी केवळ ५०१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे किटवडे येथील पर्जन्यमापक केंद्रावर १ जून २०२० पासून आजखेर तब्बल १४०६.४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी ६४.४० मि.मी. तर शुक्रवारी ९३.४० मि.मी. पावासाची नोंद झाली असून येथे अतिवृष्टी झाली आहे. सध्या तालुक्यात ठिकठिकाणी तुरळक पाऊस आहे. मात्र किटवडे परिसरात पावसाची संततधार सुरूच असून या परिसरातील शेतीच्या कामांना वेग आला आहे.