Tue, Aug 04, 2020 10:30होमपेज › Kolhapur › हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने होम क्वारंटाईन

हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने होम क्वारंटाईन

Last Updated: Aug 02 2020 12:00PM

खासदार धैर्यशिल मानेकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला आहे. माने यांच्या सासऱ्यांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसत होती त्यांचा स्वॅब तपासण्यात आल्यावर त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खासदार माने त्यांच्या संपर्कात आल्याने खबरदारी म्हणून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सोशल मिडीयावर पोस्ट करुन सांगितले आहे. 

'माझ्या सासऱ्यांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यांचा अहवाल आला असून ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत. माझा त्यांच्याशी संपर्क आल्यामुळे खबरदारी म्हणून मी माझ्या कुटुंबियांसमवेत पुढील १४ दिवस होम क्वारंटाईन होत आहे. गरजेच्या वेळी मी व माझे सहकारी आपल्या सेवेसाठी फोनवरून उपलब्ध आहोत. कोणतीही मदत लागल्यास नागरिकांनी फोनवरून संपर्क साधावा.' असा संदेश खासदार माने यांनी क्वारंटाईन होताना दिला. 

माझ्या सासऱ्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे की, त्यांनी खबरदारी म्हणून त्यांची स्वतःची लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी. आपण सर्वांनी आपल्या कुटुंबीयांची व स्वतःची काळजी घ्यावी. दरम्यान, खासदार माने यांनी कोरोना महामारीची सुरुवात झाल्यानंतर आपल्या मतदार संघातील लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना केल्या होत्या. त्यांनी याापूर्वी त्यांच्या मतदार संघातील बाहेरगावातून येणाऱ्या अनेकांना नागरिकांना क्वारंटाईन होण्यासाठी स्वतःचा बंगला खुला करून दिला होता.