Wed, May 19, 2021 05:12
गोकुळमध्ये सत्तांतर; सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांचा विजय, महाडिकांचा पराभव

Last Updated: May 04 2021 6:05PM

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

लाईव्ह अपडेट्स...

‘गोकुळ निवडणुक: तिसऱ्या फेरीअखेर विरोधी गटाचे १२ उमेदवार आघाडीवर तर सत्ताधारी गटाच्या ४ उमेदवारांची आघाडी

विरोधी पॅनेलचे विश्वास नारायण पाटील, शशिकांत चुयेकर, रणजित पाटील, आणि अभिजीत तायशेटे यांनी सर्वाधिक आघाडी घेतली आहे.

याचबरोबर आघाडीकडून चेतन नरके आणि अमरिश घाटगे यांनी आघाडी घेतली आहे.

विरोधी पॅनेलची पहिल्या फेरी अखेर १६ पैकी १४ उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. 

-  सत्ताधारी गटाच्या ७ तर विरोधी आघाडीच्या ९ जागा आघाडीवर आहेत

-विरोधी गटातील अंजना रेडेकर यांनी १८४ बाजी मारली तर अखेरपर्यंत पिछाडीवर असलेल्या शौमिका महाडिक यांनी सुश्मिता पाटील यांचा ४६ मतांनी पराभव केला.

-अमरसिंग पाटील ४३६, सुजित मिणचेकर, ३४६ तर बयाजी शेळके, २३९ मतांनी विजयी 

-महिला गटात अंजना रेडेकर १५० मतांनी विजयी

- साडेअकरा वाजता ६५० मतमोजणी पूर्ण; विरोधी आघाडी १०० मतांनी पुढे

- पहिल्या फेरीत विरोधी आघाडीचे राखीव गटातील सर्व उमेदवारी ४० ते ६५ मतांनी आघाडीवर

-माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सून शौमिका महाडिक पिछाडीवर

-माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या आई अनुराधा पाटील पिछाडीवर 

-माजी आमदार सुजित मिणचेकर आघाडीवर

-अंजना रेडेकर, सुष्मिता राजेश पाटील आघाडीवर

मतमोजणी सुरू झाली आहे. थोड्याच वेळात पहिला निकाल येणार

- सकाळी १० पर्यंत केवळ मतपत्रिकांची विभागणी संपली

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

गोकुळच्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत महिला गटात विरोधी गटातील अंजना रेडेकर यांनी १८४ बाजी मारली तर अखेरपर्यंत पिछाडीवर असलेल्या शौमिका महाडिक यांनी सुश्मिता पाटील यांचा ४६ मतांनी पराभव केला. 

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळच्या निवडणुकीत विरोधी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाने विजयी सलामी देत राखीव गटात विजय मिळविला. अनुसूचित जाती जमाती गटातून माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी विलास कांबळे, भटक्या विमुक्त जाती जमाती गटात बयाजी शेळके यांनी विश्वास जाधव, इतर मागासवर्गीय गटात अमरसिंग पाटील आणि पी. डी. धुंदरे यांचा पराभव केला आहे. अमरसिंग पाटील यांनी ४३६, सुजित मिणचेकर यांनी ३४६ तर बयाची शेळके यांनी २३९ मतांनी विजय मिळविला. 

जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजकीय संघर्षात गोकुळ केंद्रस्थानी होता. विधानपरिषद निवडणुकीत पराभव केल्यानंतर पाटील गटाने ‘गोकुळ उरलंय’ असे म्हणत तयारी केली होती. नवख्या उमेदवारांना पाटील आणि मुश्रीफ गटाने उमेदवारी दिली होती. पहिल्या फेरीत विरोधी गटाने राखीव गटातील तीन जागांवर २०० मतांची आघाडी घेतली होती. महिला गटात केवळ १० मतांचा फरक असल्याने येथे चुरस वाढली आहे.

इतर मागासवर्गीय मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक दहा ते बारा टेबलवर होणार आहे. भटक्या विमुक्त जाती जमाती व विशेष मागास प्रवर्ग या मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक एक ते १५ वर होणार आहे. अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघाची मतमोजणी टेबल क्रमांक १६ ते १८ वर होणार आहे. राखीव गटातील मतमोजणी आणि निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वसाधारण गटातील मतमोजणीस सुरूवात होणार आहे.