Wed, Oct 28, 2020 10:34



होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : सीपीआरच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आग

कोल्हापूर : सीपीआरच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आग, १५ रुग्णांना वाचवलं!

Last Updated: Sep 28 2020 9:37AM




 

 

 

 

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यातील थोरला दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीपीआरच्या ट्रामा सेंटरमध्ये आग लागली आहे. या नंतर सर्वांना अन्यत्र हलवण्यात आले आहे. ही आग आज (दि.२८) पहाटेच्या सुमारास लागली.

ही घटना समजल्यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई तातडीने सायकलने सीपीआर परिसरात पोहोचले आणि पाहणी केली. या विभागात कोरोना गंभीर रुग्णांवर उपचार सुरू होते. सीपीआरच्या अधिष्ठातांसह सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ही आग शॉर्ट सर्किटने लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाने दाखल होऊन आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या घटनेत आग विझविण्याचा प्रयत्न करताना आणि कोरोना बाधित रुग्णांना अन्यत्र स्थलांतर करताना महाराष्ट्र सुरक्षा दलाचे अमोल दत्तात्रय पाटील आणि विशाल राव भोसले हे दोघे जखमी झाले आहेत.

सीपीआरमधील ट्रामा आयसीयूमधील एका कक्षामध्ये इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आज पहाटे आग लागली होती. या कक्षातील १५ रुग्णांना वेळीच सुरक्षितरित्या स्थलांतरीत करण्यात आल्याने कोणत्याही प्रकारची जीवित हानी किंवा दुखापत झाली नाही, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के यांनी दिली.

अग्निशमन दल, वरिष्ठ डॉक्टर्स, परिचारिका, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल जवान यांनी तात्काळ आग विझवली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी लागलीच भेट देवून पाहणी केली. 
 





 







"