Wed, May 19, 2021 05:16
राधानगरी : ७ वर्षांच्या चिमुरडीसमोर २९ वर्षीय बापाचा वीजेच्या धक्क्याने तडफडून दुर्दैवी मृत्यू; वीज कर्मचाऱ्यांवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी 

Last Updated: May 04 2021 5:17PM

राधानगरी : पुढारी ऑनालईन 

७ वर्षांच्या आपल्या चिमुरडीला घेऊन वैरण आणण्यासाठी गेलेल्या वडिलांचा वीज वाहक तारेला स्पर्ध झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. तातडीने गावकरी घटनास्थळी आल्यामुळे मुलीला बाजुला केले. त्यामुळे मुलीचे प्राण वाचले. विजेचा धक्का इतका मोठा होता की, ७ वर्षांच्या चिमुरडीसमोरच वडिलांच्या तडफडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली आहे. 

वाचा ः क्राईम : शरीर-प्रेम संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली हत्या 

ही हृदयद्रावक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील सिरसे गावात घडली. रणजित हरिश टिपुगडे असे या मृत्यूमुखी पडलेल्या वडिलाचे नाव असून त्यांचे वय २९ वर्षे होते. रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने गावाला झोडपून काढले होते. या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजेच्या तारा तुटून पाण्यात पडलेल्या होत्या, परंतु, वीज कर्मचाऱ्यांनी त्याकडे दूर्लक्ष केले. वीज कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडून आली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला, त्यामुळे वीज कंपन्यांच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

वाचा ः गोकुळ निवडणुक: दुसऱ्या फेरी अखेर विरोधी गटाचे ११ उमेदवार आघाडीवर तर सत्ताधारी गटाच्या ५ उमेदवारांची आघाडी

मृत रणजित टिपुगडे हे आपल्या ७ वर्षांच्या मुलीसोबत म्हणजेच जीवनासोबत वैरण आणण्यासाठी शेताकडे जात होते. जात असताना वाटेतच रणजित यांच्या वीजवाहक तारेला स्पर्ष झाला आणि त्क्षणी मोठा विजेचा मोठा झटका बसला. मुलीसमोरच रणजित वीजेच्या झटक्याने तडफडू लागले आणि काही क्षणात त्यांनी प्राण सोडला. सुदैवाने गावकऱ्याने धावत येऊन ग्रामस्थांनी क्षणार्धात मुलीला मागे ओढल्यामुळे तिचा जीव वाचला.