Tue, Sep 29, 2020 08:37होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : महागावात कोरोनाचा पहिला बळी

कोल्हापूर : महागावात कोरोनाचा पहिला बळी

Last Updated: Aug 09 2020 2:05PM

संग्रहीत छायाचित्रमहागाव : पुढारी वृत्तसेवा 

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांवर गेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. तर जिल्ह्यातील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण बनले असून आता कोरोनाने आपला मोर्चा ग्रामीण भागातही वळवला आहे. जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे कोरोनाने पहिला मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच तालुक्यातही कोरोनाने कहर करायला सुरूवात केली आहे. आज तालुक्यातील महागाव येथे एका ७३ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. हा महागावमधील पहिला बळी असून आतापर्यंत तालुक्यात ८ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. आज झालेल्या महागाव येथील रूग्णांच्या मृत्यूमुळे हा तालुक्यातील मृतांचा आकडा ९ वर गेला असून महागाव पंचक्रोशी हबकली आहे. हा परिसर पूर्ण सील केला असून या मृत्यूने संपूर्ण परिसरात भीती वाढली आहे.

 "