Sun, Aug 09, 2020 13:50होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या कहर सुरुच; १७ नवे रुग्ण 

कोल्हापूर : कोरोनाचा कहर सुरुच; १७ नवे रुग्ण 

Last Updated: Jul 15 2020 12:31PM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना कहर कायम आहे आज (ता.१५) दिवसभरात तब्बल १७ पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ६ रुग्ण इचलकरंजी शहरात सापडले आहेत. यापाठोपाठ गांधीनगर येथे ५, हातकणंगले ३, रेंदाळ १, कोल्हापूर शहर १, पुण्यातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढच होत आहे. जिल्हात कोरोनाचे ग्रामीण भागात जास्त प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ होत आहे.

 काल मंगळवारी (दि.१४) रात्री ११ वाजेपर्यंत प्राप्‍त झालेल्या अहवालांनुसार २० जण कोल्हापूर शहरातील, तर १९ इचलकरंजी शहरातील आहेत. कोल्हापुरात आढळलेल्या २० पैकी ८ जण राजारामपुरी येथील बाधित डॉक्टरच्या संपर्कातील आहेत. दरम्यान, आज सहाजण कोरोनामुक्‍त झाल्याने त्यांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनामुक्‍त झालेल्यांची संख्याही ८६५ वर गेली.