Wed, Aug 05, 2020 18:48होमपेज › Kolhapur › चंदगड : दोन डॉक्टरांमुळे सामूहिक संसर्गाचा धोका

चंदगड : दोन डॉक्टरांमुळे सामूहिक संसर्गाचा धोका

Last Updated: Jul 04 2020 8:24PM

संग्रहित छायाचित्रचंदगड (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा 

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. रूग्णांच्या संख्येने आज (ता.४) सायंकाळी शंभरी ओलांडली असून रुग्ण संख्या १०६ झाली. चंदगडमध्ये एकूण दोन डॉक्टर कोरोनाबधित झाले आहेत. या डॉक्टरांकडे गेलेल्यांची संख्या मोठी असल्यामुळे समूह संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. तर कोरोना रुग्ण असलेल्या गावांत गावबंदी केली आहे. 

अधिक वाचा :आजऱ्यात वाढला समूह संसर्गाचा धोका

चंदगडमधील दिवसभरात १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. अडकुरमध्ये तब्बल ६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मुगळी ३ आणि ढोलगरवाडीमधल्या एका डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या डॉक्टरच्या संपर्कातील रूग्णांची प्रशासनाकडून झाडाझडती घेतली जात आहे. संपर्कात आलेल्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. चंदगडमध्ये समूह संसर्गाचा धोका वाढल्याने प्रशासनाने खबरदारी म्हणून तालुक्यातील सर्व दुकाने बंद केली आहेत. तालुक्यात आतापर्यंत १०६ कोरोनाबधित सापडले असून त्यापैकी निम्म्याहून अधिक बरे होऊन घरी परतले आहेत.