Wed, Oct 28, 2020 10:51



होमपेज › Kolhapur › नवरात्रीचा उत्सव रंगे ‘पुढारी ऑनलाईन’ संगे

नवरात्रीचा उत्सव रंगे ‘पुढारी ऑनलाईन’ संगे

Last Updated: Oct 18 2020 10:54PM




कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

नवरात्र उत्सव आणि नवरंग हे समीकरण आता घट्ट जुळले आहे. महिला या नऊ दिवसांत ठरलेल्या नवरंगांनुसार वस्त्रे परिधान करतात. नवरात्रीतील हे रंग अधिक खुलवण्याची संधी दैनिक ‘पुढारी’ने उपलब्ध केली आहे. या काळात नवरंगांनुसार परिधान केलेल्या वस्त्रांतील तुमची छायाचित्रे आता थेट दैनिक पुढारीच्या www.pudhari.com या वेबसाईटवर झळकणार आहेत.

त्यामुळे आपले नातेवाईक व मित्रपरिवारापर्यंत तुमचा हा नवरंगातील अनोखा लूक तुम्ही शेअर करू शकणार आहात. वेबसाईटवरून तुम्हाला तुमची छायाचित्रे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटस् अ‍ॅप आदी समाजमाध्यमांवरही सहज शेअर करता येतील. 

पुढारी ऑनलाईनवर फोटो कसे शेअर कराल?

1. तुमचे हे फोटो शेअर करण्यासाठी www.pudhari.com या वेबसाईटवर भेट द्या. होमपेजवर नवरंग फोटो गॅलरी-सहभागी व्हा, या बटणवर क्लिक करा.

2. किंवा सोबत दिलेल्या क्युआर कोड आपल्या स्मार्ट फोनमध्ये स्कॅन करा. येथून आपण थेट फोटो अपलोड करू शकता.


 





 







"