Mon, Jan 18, 2021 18:24
धक्‍कादायक! दानोळीत अज्ञातांकडून ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्राबाहेर अंडी, गुलाल टाकून भानामती; ग्रामस्‍थ हैराण  

Last Updated: Jan 14 2021 12:15PM
दानोळी : पुढारी वृत्तसेवा

येथे होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अज्ञातांनी निवडणूक केंद्र पूजल्याने हा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. पूजा करून मुख्य गेटवर नारळ, गुलाल, केळ, अंडी, तांदूळ आदींचा सडा घातल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. (Black magic insident outside the Gram Panchayat polling booth Danoli in Kolhapur) भानामतीच्या या प्रकाराने गावात खळबळ उडाली आहे. असे प्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 

अधिक वाचा : 'धनंजय मुंडेंवरील आरोप प्रकरणी शरद पवार घेतील निर्णय’

निवडणुकीत विरोधी गटातील उमेदवाराचा पराभव व्हावा किंवा नुकसान व्हावे अशा वाईट हेतूने काही लोकांकडून अंधश्रेध्देतून भानामतीसारखे प्रकार केले जातात. यामुळे समाजात अजुनही अंधश्रध्देचे गारूड असल्‍याचे दिसत आहे. या प्रकाराने हैराण झालेल्‍या दानोळीच्या ग्रामस्‍थांनी कारवाईची मागणी केली आहे.