Mon, Aug 10, 2020 21:32होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने एका वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने एका वृद्धाचा मृत्यू

Last Updated: Jul 10 2020 11:53AM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

कोल्हापूर जिल्ह्यातील सीपीआरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह वृध्दाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (ता.८) सीपीआरमध्ये पुढील उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. परंतु वृद्धाची तब्बेत दिवसेंदिवस खालावत गेली. दरम्यान, त्यास आज (ता.१०) सीपीआर प्रशासनाने मृत म्हणून घोषीत केले. मृत व्यक्ती राजापूर तालुक्यातील असल्याचे सांगण्यात आले. 

अधिक वाचा :  वस्त्रोद्योगातील घटकांना व्याज दराची सवलत द्या, राजू शेट्टींची मागणी

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाचे २२ नवे रुग्ण वाढले आहेत. दिवसभरात एकाचा कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या २२ वर गेली. सहाजण कोरोनामुक्त झाल्याने  पूर्ण बरे झालेल्यांची संख्याही ७९६ वर गेली. सध्या अडीचशेच्यावर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजाराच्या वर गेली आहे.